Gymnastics  sakal
क्रीडा

Gymnastics : जेएसडब्ल्यू व लीप जिम्नॅस्टिक दहा हजार जिम्नॅस्टिक घडवणार

जेएसडब्ल्यू ग्रुपच्या लीप जिम्नॅस्टिक अकादमीने देशात येत्या पाच वर्षांत दहा हजार उत्तम जिम्नॅस्टिक खेळाडू घडवण्याचे लक्ष ठेवले असून मुंबईतही एक हजार खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जेएसडब्ल्यू ग्रुपच्या लीप जिम्नॅस्टिक अकादमीने देशात येत्या पाच वर्षांत दहा हजार उत्तम जिम्नॅस्टिक खेळाडू घडवण्याचे लक्ष ठेवले असून मुंबईतही एक हजार खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल. लीप जिम्नॅस्टिक्स हा जेएसडब्ल्यू ग्रुपचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून आतापर्यंत जेएसडब्ल्यू समूहाने इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स स्काऊटतर्फे भारतात फुटबॉल, बॉक्सिंग, कुस्ती, पोहणे, जुडो, ट्रॅक अँड फीड या खेळात विशेष प्रशिक्षण मोहीम राबवली आहे.

या संयुक्त मोहिमेनुसार आज वरळी येथे एका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सध्या मुंबईत त्यांच्या तीन केंद्रांत एक हजार मुलांना प्रशिक्षण दिले जाते. लवकरच मुंबईत आणखीन तीन केंद्रे उघडली जातील; तर देशभरात पुढील वर्षभरात दहा हजार खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार केले जातीलच, पण त्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रमही तयार केला जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य घेऊन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि पंचदेखील तयार केले जातील. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आणि मान्यता यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी लीप जिम्नॅस्टने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक तज्ज्ञ किम डोडेल यांचे साह्य घेतले आहे.

महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन बरोबर सहकार्य करून लीप जिम्नॅस्टिकतर्फे अकरा व बारा मे दरम्यान पहिली जिम्नॅस्टिक स्पर्धाही भरवण्यात येईल. त्यात राज्यातील अडीचशे जिम्नॅस्टिक सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT