Kerala man playing freestyle football in lungi
Kerala man playing freestyle football in lungi 
क्रीडा

'या' आजोबांचा नादच खुळा! फुटबॉल स्किल बघून तुम्ही देखील व्हाल थक्क

Kiran Mahanavar

Kerala man playing freestyle football in lungi : क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ वय फक्त एक नंबर आहे. आत्तापर्यंत शेकडो लोकांनी हे सिद्ध केले आहे. असाच केरळमधील एका आजोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याने आपल्या फुटबॉल खेळाच्या कौशल्याने इंटरनेट जनतेची मने जिंकली आहे. खरंतर हे आजोबा फुटबॉलपटू असायचे, पण पोटासाठी ते ट्रक चालवतात.

हा जबरदस्त व्हिडिओ फुटबॉलपटू प्रदीपने (prsoccerart) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तो कॅप्शनमध्ये लिहितो, 'मला या ६४ वर्षीय आजोबांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले, जे अजूनही फुटबॉल खेळतात. त्याच बरोबर पोटासाठी ते ट्रक पण चालवतो. ट्रकमध्ये त्याच्यासोबत फुटबॉल किट पण असते. आजोबा वायनाड फुटबॉल संघाकडून (Wayanad Football Team) अजूनही खेळ आहे. त्यांच्याकडून मी एक शिकलो, जर तुम्हाला काही करायला आवडत असेल तर ते करायचं. एके दिवशी आपण हे जग सोडून जाऊ, म्हणून आयुष्य जसं जगायला आवडेल तसं जगा.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की टी-शर्ट, पायजमा आणि शूज घातलेला एक तरुण आजोबासमोर फुटबॉल वर पराक्रम करत आहे. मात्र, आजोबा केवळ लुंगी आणि शर्ट घालून शांत उभे आहे. पण जेव्हा फुटबॉल त्याच्याकडे येतो तेव्हा भाऊ, त्याचे अप्रतिम कौशल्य पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. व्हिडिओमध्ये पाहिलं तर मुलगा त्याच्यांकडे फुटबॉल पास करताच, आजोबा पायावरचा चेंडू गळ्यात घेऊन कपाळावर आणतात. हे पाहून तो माणूस स्तब्ध होतो. व्हिडिओवर आत्तापर्यंत ४.९ मिलियन व्ह्यूज आणि ६ लाख ३९ हजार लाईक्स आल्या आहेत. तसेच शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT