kiren rijiju
kiren rijiju 
क्रीडा

Commonwealth Games 2022 : बहिष्काराच्या निर्णय इतक्‍यात नाही - रिजीजू 

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 
नवी दिल्ली - नेमबाजीला वगळण्यावरून 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याविषयी इतक्‍या लवकर घेता येणार नाही, असे मत केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केले. 

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रीय रायफल संघटनेने केंद्र सरकारकडे राष्ट्रकुल स्पर्धेवरच बहिष्कार टाकण्याचा प्रस्तावर पाठवला आहे. रिजीजू म्हणाले,""भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली आहे. त्यांनी या बैटकीत नेमबाजीला वगळल्याचा आणि स्पर्देवर बहिष्कार टाकण्याविषयी माहिती दिली आहे. त्या वेळी त्यांना राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि संयोजन समितीशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.'' 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या बहिष्काराचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवत रिजीजू यांनी समोर ठेवलेल्या उद्दिष्टांविषयी आपली मते मांडली. ते म्हणाले,""तीन महिन्यापूर्वीच क्रीडा मंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे आणि दहा महिन्यात टोकियो ऑलिंपिक आहे. त्यामुळे उपलब्ध गुणवत्तेकडूनच या ऑलिंपिक स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आम्ही ठेवली आहे. आम्ही गुणवत्ता शोध मोहिमेला सुरू करण्याचा आणि त्यांना सर्व सुविधा पुरविण्याचा विचार करत आहोत. गेल्या ऑलिंपिक स्पर्धेपेक्षा या वेळी अधिक चांगल्या कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे. पण, ऑलिंपिक स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता किती पदके मिळतील याचा अंदाज व्यक्त करणे कठिण आहे. आम्ही आतापासून 2024 आणि 2028 ऑलिंपिक स्पर्धेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.'' 

रिजीजू म्हणाले... 
-आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
-भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंध हे पूर्णपणे सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असतील 
-प्रत्येक भारतीयाने तंदुरुस्त रहावे यासाठी सरकार "तंदुरुस्त भारत' मोहिम सुरू करणार आहे 
-प्रत्येक भारतीय तंदुरुस्त राहिला, तर आपली ताकद सर्वच क्षेत्रात वाढणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT