andre russell gifts himself new mercedes benz amg car
andre russell gifts himself new mercedes benz amg car 
क्रीडा

रसेलने IPL 2022 नंतर खरेदी केली नवीन मर्सिडीज-बेंझ AMG कार; जाणून घ्या किंमत

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. परंतु वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार रसेलने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. रसेलला KKR ने IPL 2022 मेगा लिलावात 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. आयपीएल 2022 संपल्यानंतर आता रसेलने स्वतःला एकमर्सिडीज-बेंज एएमजी कार खरेदी केली आहे.(andre russell gifts himself new mercedes benz amg car)

रसेलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या नवीन कारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहतो आणि मेहनतीच्या बळावर साकार करतो. कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. आद्रे रसेलने नवीन कार खरेदी केल्यानंतर त्याच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त ख्रिस गेल, डॅरेन सॅमी आणि सूर्यकुमार यादव सारखे अनेक क्रिकेटपटू देखील आहेत.

आयपीएलमधील या हंगामात रसेलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने केकेआरसाठी 335 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 174.5 होता. त्याची सरासरी ३७.२२ होती तर सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ७० होती. याशिवाय त्याने 14 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आणि या मोसमातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 5 धावात 4 अशी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT