KL Rahul Injured Hardik Pandya May Lead Team India In Ireland England In White Ball Cricket
KL Rahul Injured Hardik Pandya May Lead Team India In Ireland England In White Ball Cricket esakal
क्रीडा

केएल राहुल जायबंदी; पांड्याच्या गळ्यात पडणार नेतृत्वाची माळ?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा तीनही फॉरमॅटमधील महत्वाचा खेळाडू केएल राहुलला दुखापत झाल्याने तो इंग्लंड विरूद्धचा एकमेव कसोटी सामना मुकण्याची शक्यता आहे. तो अजून दुखापतीतून सावरलेला नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेपाठोपाठ इंग्लंड दौऱ्यातील कसोटीला देखील मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये नवडे मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. सध्या ऋषभ पंत भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र तो इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. (KL Rahul Injured Hardik Pandya May Lead Team India In Ireland England In White Ball Cricket)

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'राहुल अजून दुखापतीतून सावरलेला नाही. आज भारतीय कसोटी संघ मुंबईत एकत्र येत आहे. ते मध्यरात्री इंग्लंडसाठी रवाना होतील. राहुल त्यांच्याबरोबर जाणार नाहीये. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. तो या आठवड्याच्या शेवटची फिटनेस टेस्ट देण्याची शक्यता आहे. तो इतक्यात दुखापतीतून सावरण्याची लक्षणे अजून तरी दिसत नाहीयेत.'

ऋषभ पंत सोडला तर इतर खेळाडू गुरूवारी पहाटे इंग्लंडसाठी रवाना होतील. तेथे 1 ते 5 जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना 2021 च्या इंग्लंड दौऱ्यावेळी स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, निवडसमितीने अजूनपर्यंत केएल राहुलच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही.

सूत्रांनी सांगितले की, 'तुमच्याकडे शुभमन गिल आहे. त्याने अनेक कसोटी सामन्यात सलामी दिली आहे. याचबरोबर चेतेश्वर पुजारा देखील सलामीला खेळू शकतो. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तरी 17 सदस्यांचा संघ निवडला आहे. त्यातील 16 खेळाडू जातील त्यामुळे रिप्लेसमेंट हा काही मोठा विषय नाही.'

ऋषभ पंत हा आर्यलंडविरूद्धचे दोन टी 20 सामने खेळणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत उपकर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला आर्यलंडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'संघात दिनेश कार्तिक सारखा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जोडीला भुववनेश्वर कुमार देखील आहे. तसेच संघात हार्दिक पांड्या देखील आहे. त्याने पंत कर्णधार असताना उपकर्णधाराची भुमिका बजावली आहे. त्यामुळे तोच कर्णधार पदासाठी पहिली पसंती असेल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT