ICC ODI Ranking : पाकिस्तानच्या इमामने विराटला टाकले मागे

ICC ODI Batting Ranking Imam-ul-Haq Surpasses Virat Kohli Gain Second Spot
ICC ODI Batting Ranking Imam-ul-Haq Surpasses Virat Kohli Gain Second Spotesakal

दुबई : आयसीसीने नुकतेच वनडे बॅटिंग रँकिंगची घोषणा केली. या रँकिंगमध्ये भारताचा रनमशिन मात्र सध्या खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट कोहलीची क्रमवारी घसरली आहे. तर मायदेशात झालेल्या वेस्ट इंडीज विरूद्धची वनडे मालिका 3-0 अशी जिंकल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना फायदा झाला आहे. इमाम - उल - हकने या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे आयसीसी वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये इमामने विराट कोहलीला देखील मागे टाकले. (ICC ODI Batting Ranking Imam-ul-Haq Surpasses Virat Kohli Gain Second Spot)

ICC ODI Batting Ranking Imam-ul-Haq Surpasses Virat Kohli Gain Second Spot
दृष्टीहीन स्टेफनने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात त्रिशतक ठोकून केले वर्ल्ड रेकॉर्ड

वनडे रँकिंगमध्ये डावखुरा फलंदाज इमाम सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या एका क्रमांकाने खाली आहे. तर विराट कोहलीपेक्षा एक क्रमांकाने वर आहे. यापूर्वी विराट कोहली क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या बाबर आझमच्या (892 गुण) खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता इमाम (815 गुण) दुसऱ्या स्थानावर पोहचला अजून विराट कोहली (811 गुण) तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

ICC ODI Batting Ranking Imam-ul-Haq Surpasses Virat Kohli Gain Second Spot
'त्यानंतर तो काही करत नाही', कपिल देव यांनी सॅमसनबद्दल लावला निराशेचा सूर

आयसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा विराट कोहलीनंतर 791 गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. आता भारत जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बाबर आझमने वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे. त्याने विंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात शतक तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com