Sports
Sports Canva
क्रीडा

कोल्हापुरात मैदानं गजबजणार ; खेळाडूंसाठी ॲक्शन प्लॅन तयार

सुयोग घाटगे

कोल्हापूर : सलग दोन वर्षे बंद असणारे क्रीडा क्षेत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोल्हापूर क्रीडा कार्यालयाने कंबर कसली आहे. दोन महिन्यांपासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह, तालुका क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मिळून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक ॲक्शन प्लॅन बनवला आहे. हा प्लॅन जिल्हाधिकारी व क्रीडा मंत्रालयाकडे पाठविला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून क्रीडा क्षेत्र बंद आहे. किरकोळ स्पर्धा आणि काही जणांचा सराव वगळता इतर सर्व ठप्प झाले आहे. यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्य वाढून खेळ क्षमता कमी होऊ लागली आहे. त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून व आगामी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह ३ वर्षांनी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्जता सुरू झाली आहे.

दूरगामी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अधिकाधिक खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचा विचार सध्या सुरू आहे. या ॲक्शन प्लॅनमध्ये सुरवातीच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना सरावासाठी परवानगी देण्यात आली असली तरीही या सोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस झालेल्यांनाही मैदानावर जाता येणार आहे. पुढील टप्प्यामध्ये शारीरिक संपर्क नसणारे अथवा कमी शारीरिक संपर्काच्या खेळांना आणि सरावाला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल तसेच यासारख्या कमी संपर्काच्या खेळांचा समावेश आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून क्रीडा क्षेत्र बंद आहे. किरकोळ स्पर्धा आणि काही जणांचा सराव वगळता इतर सर्व ठप्प झाले आहे.

तीव्र संपर्काच्या खेळाच्या बाबतीत निर्णय मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, ही मंजुरी कोरोना चाचणी अहवाल, खेळाडूची शारीरिक आणि रोग प्रतिकार क्षमता, लसीकरणाची सद्यस्थिती आणि कोरोना स्थिती यावर अवलंबून आहे. यामध्ये जलतरण, बॉक्सिंग, कुस्ती, विविध मार्शल आर्ट, फेन्सिंग, फुटबॉल यासारख्या इतर खेळांचा समावेश आहे. हे सर्व खेळ ५० टक्के खेळाडूंच्या उपस्थितीत खेळणे अथवा सराव करणे बंधनकारक असणार आहे. सर्व सराव अथवा स्पर्धा ठिकाणी सॅनिटायझर व तापमापक यंत्राची सोय असणे बंधनकारक असून, खासगी प्रशिक्षण संस्थांनी याचे पालन न केल्यास केंद्र बंदीची कारवाई होऊ शकते. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्याला मंजुरी मिळाल्यास खेळाडूंचा जीव भांड्यात पडेल.

खेळाडूंचे होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे. एखाद्या खेळाडूसाठी दोन वर्षाचा काळ हा खूप आहे. यामुळे त्याच्या खेळावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन लय बिघडते. हे जाणूनच कार्यालयातील सर्वांच्याच मदतीने एक रूपरेषा बनवण्यात आली असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील खेळाडू पुन्हा मैदानावर दिसतील..

-डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

HSC Result: बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषानं घडवला इतिहास! असा केला अभ्यास

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

SCROLL FOR NEXT