Lee Chong Wei can't play benefit to Srikanth? 
क्रीडा

ली चोंग वेईची माघार श्रीकांतच्या पथ्यावर? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : ली चोंग वेई हा जागतिक बॅडमिंटन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या ली चोंग वेईच्या संभाव्य अनुपस्थितीचा जागतिक स्पर्धेत श्रीकांतला फायदा होईल. 

जागतिक स्पर्धा 30 जुलैपासून सुरू होईल. या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी मलेशियाने आयोजित केलेल्या शिबिरात तो सहभागी झालेला नाही. चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चोंग वेईला दुसरे मानांकन आहे. स्पर्धेच्या ड्रॉनुसार श्रीकांत आणि चोंग वेई यांची उपांत्यपूर्व फेरीत लढत अपेक्षित आहे. 

ली चोंग वेईच्या शिबिरातील अनुपस्थितीची मलेशियातील माध्यमात चांगलीच चर्चा आहे. त्याने आपल्याला विश्रांतीची गरज आहे. त्याची ही विनंती ऐकून मला धक्काच बसला. अनफिट असतानाही तो पुनर्वसनासाठी ट्रेनिंग सेंटरला येत असे. जागतिक स्पर्धा एका आठवड्यावर असताना त्याचा ब्रेक धक्कादायक आहे. तो आमच्यापासून काय लपवत आहे का, याबाबत मी काही बोलणार नाही; पण विश्रांतीची गरज त्याला चांगलीच भासत असेल, तो त्याचा हक्क आहे, असे मलेशियाचे मार्गदर्शक दातून मिसबून सिदेक यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

चोंग वेईच्या अनुपस्थितीचा श्रीकांतला नक्कीच फायदा होईल. दोघातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांत पराजित झाला होता. बॅडमिंटन अभ्यासक चोंग वेईची चांगलाच धोकादायक असलेल्या झु वेई वँग याच्याविरुद्ध लढत अपेक्षित आहे. या लढतीतच चोंग वेई याचा कस लागला असता, असे सांगितले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT