adity golf sakal
क्रीडा

जाणून घ्या अदितीनं लक्षवेधी कामगिरी केलेल्या गोल्फ बद्दल

समजून घेऊ ऑलिंपिकची गोल्फ स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

समजून घेऊ ऑलिंपिकची गोल्फ स्पर्धा

  • ऑलिंपिक गोल्फ स्पर्धा चार दिवसांची असते.

  • स्पर्धक रोज १८ लक्ष्य साध्य करतात.

  • प्रत्येक लक्ष्यासाठीचे स्ट्रोक्स निश्चित

  • पहिल्या तीन क्रमांकांत बरोबरी असल्यास तीन लक्ष्यांचा प्लेऑफ खेळविण्यात येतो

गुण कसे मोजतात?

प्रत्येक लक्ष्यासाठीचे (गोल्फच्या भाषेत होल) स्ट्रोक्स निश्चित असतात. समजा, एखादे लक्ष्य पाच स्ट्रोक्समध्ये साध्य करण्याचे ठरले असल्यास आणि ते साध्य केल्यास त्यास अॅट पार म्हणतात. त्यापेक्षा एक जास्त घेतल्यास त्यास बोगी आणि दोन जास्त घेतल्यास डबल बोगी म्हणतात. निश्चित स्ट्रोकपेक्षा एक कमी स्ट्रोक घेतल्यास त्यास बर्डी म्हणतात, दोन कमी घेतले, तर त्यास इगल म्हणतात.

विजेता कसा ठरतो?

कमीत कमी प्रयत्नात लक्ष्य साधण्याची स्पर्धा असते. प्रत्येक लक्ष्य गुण देत असते. स्पर्धा संपल्यानंतर ज्याचे स्ट्रोक्स कमी असतात. तो स्पर्धक अव्वल येतो.

महिलांना प्रवेशबंदी होती

साईतामा येथील कावागोए शहरातील कासुमिगासेकी कंट्री क्लबवर ही स्पर्धा होत आहे. जपानमधील प्रतिष्ठित क्लबमध्ये याची गणना होते. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या या क्लबमध्ये कित्येक वर्षे महिलांसाठी अनेक निर्बंध होते. महिलांना रविवारी खेळण्यास मनाई होती. तसेच त्यांना क्लबचे पूर्ण सदस्यही होण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे त्यांना कायम लक्ष्य केले जात असे. अखेर २०१७ मध्ये पुरुषांना प्राधान्य देण्याचे धोरण रद्द झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT