Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News 
क्रीडा

Asia Cup 2023 : अखेरच्या क्षणी 'या' खेळाडूची संघात एंट्री! दिग्गज सलामीवीर स्पर्धेतून बाहेर

Kiran Mahanavar

Litton Das ruled out of the Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया कपचा थरार रंगणार आहे. आशिया कप सुरू होण्याच्या काही तास आधी बांगलादेशी संघाला मोठा धक्का बसला. दिग्गज सलामीवीर स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

आशिया कप सुरू होण्यापूर्वीच बांगलादेश संघावर संकटांचा डोंगर कोसळला. बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तापामुळे तो आधीच संघासोबत आला नव्हता. बांगलादेशी संघाचा पहिला सामना गुरुवारी पल्लेकेलमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या राष्ट्रीय निवड समितीनेही लिटनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली. 30 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज अनामुल हक बिजॉय आता लिटनच्या जागी संघात सामील होणार आहे.

याआधी स्टार सलामीवीर लिटन दास आजारपणामुळे रविवारी श्रीलंकेला जाणाऱ्या विमानात संघासोबत बसला नव्हता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट सुकाणू समितीचे अध्यक्ष जलाल युनूस म्हणाले, 'लिटन दासला ताप आहे. लिटन दासची डेंग्यूची चाचणी झाली असली तरी तो नॉर्मल आला आहे. लिटन सावरला नाही तर आम्हाला बदलीचा विचार करावा लागू शकतो.

लिटन दासने बांगलादेश संघाकडून 72 वनडे खेळताना 34.04 च्या सरासरीने 2213 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 39 कसोटींमध्ये त्याच्या 2394 धावा आहेत. याशिवाय त्याने 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1670 धावा केल्या आहेत.

आशिया कप 2023 साठी बांगलादेश संघ : शकीब अल हसन (कर्णधार), तनजीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम होसेन, मुशफिकर रहमान. हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, मोहम्मद नईम, अनामूल हक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT