Look Back 2023 esakal
क्रीडा

Look Back 2023 : आयसीसी ट्रॉफीच्या दोन फायनल हरल्या मात्र वर्षभरातील टीम इंडियासाठी 'ही' आकडेवारी आहे दिलासादायक

अनिरुद्ध संकपाळ

Look Back 2023 : भारतीय क्रिकेट संघाने 2023 मध्ये दोन आयसीसी ट्रॉफींच्या फायनल खेळल्या. मात्र दोन्ही फायनलमध्ये भारताच्या पदरी निराशाच पडली. भारताने WTC ची आणि वनडे वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर सर्व चाहते निराश झाले आहेत. मात्र टीम इंडियासाठी 2023 हे दोन आयसीसी कप जिंकण्याची संधी गमावणारं वर्ष ठरलं असलं तरी टीम इंडियाने या संपूर्ण वर्षात चांगलं क्रिकेट खेळलं.

भारतीय संघाने कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये दमदार कागमिरी करत अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या. आयसीसी स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे.

दोन कसोटी मालिकांमध्ये विजय

भारताने 2023 मध्ये दोन कसोटी मालिका खेळल्या. फेब्रुवारी - मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2 - 1 असा विजय मिळवला. तर जुलै महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका वेस्ट इंडीज दौऱ्यावर असताना खेळली गेली होती. भारताने ही मालिका देखील 1 - 0 अशी खिशात टाकली. विंडीजमधील मालिका भारताने 2 - 0 अशी जिंकायला हवी होती.

वनडे मालिका जिंकून वर्षाची सुरूवात

भारताने 2023 ची सुरूवात श्रीलंकेविरूद्धची वनडे मालिका जिंकून केली. तीन सामन्यांची ही मालिका भारताने 3 - 0 अशी जिंकली. त्यानंतर जानेवारी महिन्यात न्यूझीलंडला 3 - 0 असे पराभूत केलं. मात्र मार्च महिन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2 - 1 असा पराभव केला.

जुलै - ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीजविरूद्धची मालिका भारताने 2 - 1 अशी जिंकली तर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला 2 - 1 असे पराभूत करत पराभवाची परतफेड केली.

चार टी 20 मालिका खिशात

भारताने या वर्षी चार टी 20 मालिका जिंकल्या आहेत. जानेवारी महिन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंडविरूद्ध भारताने प्रत्येकी 3 सामन्यांची मालिका खेळली. या दोनही मालिका भारताने 2 - 1 अशा जिंकल्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

वेस्ट इंडीजने 5 टी 20 सामन्यांची मालिका ही 3 - 2 अशी जिंकली. याच महिन्यात भारताने आयर्लंडविरूद्धची दोन सामन्यांच्या मालिका 2 - 0 अशी जिंकली. वनडे वर्ल्डकपनंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 4 - 1 अशी जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत राहिली.

वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी

वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने लीग स्टेज आणि सेमी फायनल असे सलग 10 सामने जिंकले होते. मात्र संघाला फायनल जिंकता आली नाही. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदलँडला पराभूत केलं.

त्यानंतर सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला पुन्हा मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र वर्ल्डकपमधील 11 वा सामना... ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम सामना भारताला जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळणाऱ्या भारताचा पराभव करत सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

SCROLL FOR NEXT