Madhya Pradesh Beat Bengal Reached Ranji Trophy Final After 1999 Second Time
Madhya Pradesh Beat Bengal Reached Ranji Trophy Final After 1999 Second Time BCCI
क्रीडा

Ranji Trophy :मध्यप्रदेश 23 वर्षानंतर पोहचले फायनलमध्ये; BCCI अध्यक्षांच्या टीमचा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Bengal vs Madhya Pradesh, 1st Semi-Final: रणजी ट्रॉफी पहिल्या सेमीफायनलमध्ये मध्यप्रदेशने बंगालचा 174 धावांनी पराभव करत फायनल गाठली. 1999 नंतर पहिल्यांदाच मध्यप्रदेश रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचली आहे. बंगाल विरूद्धच्या सामन्यात मध्यप्रदेशने पहिल्या डावात 341 धावा केल्या होत्या. त्यानंतर याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बंगालला 273 धावांपर्यंतच मजल मारती आली होती. पहिल्या डावात 68 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने 281 धावा करत बंगलासमोर विजयासाठी 350 धावांचे आव्हान ठेवले. मात्र बंगलचा दुसरा डाव 175 धावातच संपुष्टात आला. (Madhya Pradesh Beat Bengal Reached Ranji Trophy Final After 1999 Second Time)

मध्यप्रदेशने सेमी फायलन 174 धावांनी जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशच्या कुमार कार्किकेयने दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. त्याच्या या स्पेलमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. कार्तिकेय बरोबरच गौरव यादवने 3 तर सारांश जैनने 2 विकेट घेतल्या. कार्तिकेयने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेत मध्यप्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मध्यप्रदेश 1999 नंतर दुसऱ्यांदाच रणजी ट्रॉफी फायनलमध्ये पोहचली आहे. 1999 मध्ये मध्यप्रदेशला कर्नाटककडून 96 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

मध्यप्रदेश विरूद्धच्या सामन्यामध्ये बंगालकडून पहिल्या डावात मनोज तिवारी (102) आणि शाहबाज अहमद (116) धावांची शतकी खेळी केली होती. तर मध्यप्रदेशकडून पहिल्या डावात हिमांशु मंत्रीने 165 धावांची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशकडून रजत पाटीदारने 79 तर आदित्य श्रिवास्तवने 82 धावांची खेळी केली. तर बंगालचा कर्णधार अभिमन्यू इश्वरनने 78 धावांची झुंजार खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT