Maharashtra Kesari 
क्रीडा

Maharashtra Kesari 2023: ''यशाच्या मोहापोटी डोपिंगला बळी पडू नका''

युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Kesari 2023: ईर्ष्या, प्रामाणिकपणा आणि एकाग्रता कुस्तीत हवीच; पण कुस्ती पेशाशी निष्ठावंतपणा तितकाच महत्त्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र केसरी आप्पा कदम यांनी व्यक्त केले़. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

श्री. कदम म्हणाले, ‘‘काळ बदलला तरी कुस्तीवरील लोकांचे प्रेम काही कमी होत नाही. किंबहुना, आजच्या मोबाईलच्या तसेच सोशल मीडियाच्या जमान्यात तरुण पिढी कुस्तीकडे वळते आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. राज्य शासनाची कुस्तीबाबत असलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. मुळात हा खेळ खर्चिक आहे. सामान्य कुटुंबातील मुलांना या क्षेत्रात कारकीर्द करायची म्हटल्यास परवडत नाही. शासनानेच याकामी पुढाकार घेऊन उदयोन्मुख कुस्तीपटूंचा खर्च उचलावा. तसे झाल्यास कुस्तीला अधिक प्रोत्साहन मिळेल.’’

ते म्हणाले, ‘‘कुस्तीतील बदलते तंत्र स्वागतार्ह असून, झटपट कुस्तीसाठी ते महत्त्वाचे आहे. पूर्वी दोन ते तीन तास कुस्ती चालायच्या. आता मात्र पाच मिनिटांत मॅटवरील कुस्ती निकाली लागते. भविष्यात कुस्तीत पैसा येईल, तो महत्त्वाचाही आहे; पण तो मिळवत असताना कुस्तीवरील निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. झटपट यशाच्या मोहापोटी डोपिंगला बळी पडू नका. यातून तुम्हाला अल्पकाळासाठी यश मिळेल; पण तुमची प्रतिमा डागाळली जाईल. तेव्हा अशा गोष्टींपासून लांब राहा.’’

ते म्हणाले, ‘‘कुस्तीगीरांचा लोक पूर्वीही आदर करीत होते आणि आजही करतात. कुस्तीत यश मिळवायचे असल्यास कष्टाची तयारी ठेवा. सरावातील सातत्य, एकाग्रता तुम्हाला निश्‍चितपणे यशाचे दार खुले करते. पुण्यात सध्या सुरू असलेली स्पर्धा पाहता महाराष्ट्र केसरीच्या जेवढ्या स्पर्ध्या झाल्या, त्यात ही स्पर्धी सुवर्णाक्षरांनी नोंद करावी, अशी आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पूर्वी कुस्तीसाठी साधनांची कमतरता होती. लालमातीचा आखाडा तेवढाच काय तो आधार होता. संपर्कासाठी साधने कमी होती. देशपातळीवर तसेच ऑलिम्पिकसाठी जायचे म्हटल्यास प्रवास कठीण असायचा. आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उपलब्ध होऊ शकतात. त्याचाही फायदा तरुण पिढीने घ्यावा. एखाद्या स्पर्धेत अपयश मिळाले म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने सरावाला लागावे. विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केल्यास निश्‍चितपणे यश मिळते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT