live
live 
क्रीडा

मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीत संदीप, राणाची चमक

सकाळवृत्तसेवा

  नाशिकः  देवांगेरे(कर्नाटक) येथे सुरु असलेल्या: मारूती सुझुकी डेअर स्पर्धेत टिम मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्स संघाला संदीप शर्मा व सुरेश राणा यांनी दुस-या दिवशी पिछाडीवरुन पुनरागमन करत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळवले. सुझुकीच्या संदीप व त्याचा सहचालक अनमोल रामपाल यांनी तीन विशेष स्तरामध्ये 58.09 सेकंद वेळ नोंदवत पहिल्या दोन दिवसांमध्ये 03:35:05 अशी वेळ नोंदवली.
 संदीप शर्माचा सहकारी 10 वेळचा रेड दी हिमालयचा चॅम्पियन सुरेशा राना (चिराग ठाकूरसह) याने जोरदार पुनरागमन करत सहावे स्थान मिळवले.रानाला पहिल्या दिवशी पंक्‍चर टायरमुळे मागे रहावे लागले होते..त्याने दिवसाची तिसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली.
     तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलने आपला फॉर्म कायम ठेवत अव्वल स्थान मिळवले.महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रेसर असलेल्या गौरवने आपला सहचालक मुसा शेरीफसह तीन विशेष स्तरासह एक सुपर विशेष स्तरात चमक दाखवली.. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई ( नेव्हिगेतर पी व्हीएस मूर्तीसह) याने 03:26:03 मिनिट वेळेसह दुसरे स्थान मिळवले.
   

महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर रेसर अमित्रजित घोष (सहचालक अश्‍विन नाईक) याला सहा मिनिटांचा तोटा सहन करावा लागल्याने तिस-या स्थानी रहावे लागले. युवा कुमारने बाईक  विभागात दोन स्तर पूर्ण करत दुस-या रेसमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले.तर, आकाश व विश्‍वास यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.टीएसडी गटात प्रमोद विग आणि प्रकाश विग यांनी अव्वल स्थान मिळवले तर, संतोष व नागराजनने दुसरे तर, श्रीकांत व रघुरमनने तिसरे स्थान पटकावले.
..
 दुस-या दिवसानंतर निकाल : 
- कार  
1) गौरव गिल/ मुसा शेरीफ (टीम महिंद्रा अ‍ॅडेव्हेंचर 03:19:50) 2) फिलिपोस मथाई / पीव्हीएस मूर्थी ( टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर 03:26:03) 3) अमित्रजित घोष/ अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर 01:15:31.2)
- बाईक :
1) युवा कुमार - 02 :24:24, आकाश ऐटल- 02:32:00, विश्‍वास एस डी - 02: 34:46

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT