jonty rhodes
jonty rhodes 
क्रीडा

जाँटी-होड्स यांनी 'मुंबई इंडियन्स'चे प्रशिक्षकपद सोडले

वृत्तसंस्था

मुंबई : गेली नऊ वर्षे 'मुंबई इंडियन्स' या 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील बलाढ्य संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जाँटी-होड्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी 'आयपीएल'पासून ते 'मुंबई इंडियन्स'च्या संघासोबत काम करणार नाहीत. त्यांच्याऐवजी न्यूझीलंडमधील क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जेम्स पॅमेन्ट यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

2009 च्या स्पर्धेपासून जाँटी-होड्स 'मुंबई इंडियन्स'च्या प्रशिक्षकांच्या चमूचा अविभाज्य घटक होते. या कालावधीत 'मुंबई इंडियन्स'च्या क्षेत्ररक्षणात आमूलाग्र बदल झाले. आता स्वत:च्या व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष देण्याची गरज असल्याने होड्स यांनी 'आयपीएल'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

होड्स यांच्याऐवजी निवड झालेले जेम्स पॅमेन्ट हे न्यूझीलंडमधील अनुभवी प्रशिक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी न्यूझीलंडमधील 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स'चे प्रशिक्षकपदही भूषविले आहे. 2014 मध्ये झालेल्या 'चॅम्पियन्स करंडक ट्वेंटी-२० स्पर्धे'त 'मुंबई इंडियन्स' आणि या संघाची लढत झाली होती. 'या संघाचे क्षेत्ररक्षण आतापर्यंत आमच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वोत्तम होते', अशी प्रतिक्रिया 'मुंबई इंडियन्स'चे मालक आकाश अंबानी यांनी व्यक्त केली. 

'जाँटी -होड्स यांनी 'मुंबई इंडियन्स'मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणाची परंपरा निर्माण केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. 'मुंबई इंडियन्स' हा बलाढ्य आणि विजेता संघ आहे. यासाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे', अशी प्रतिक्रिया पॅमेन्ट यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT