Marcus Stoinis  ESAKAL
क्रीडा

Marcus Stoinis : स्टॉयनिस जाम भडकला, अंपायरला नडला मात्र त्याच्याच हाताने केला घात?

अनिरुद्ध संकपाळ

Marcus Stoinis : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे SENA देशांमधील दोन तगडे संघ आज भिडणार म्हटल्यावर अटीतटीचा सामना आणि दर्देदार क्रिकेट पाहण्याची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र 5 वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने नांगी टाकली.

दक्षिण आफ्रिकेचे 312 धावांचे आव्हान पार करताना कांगारूंचा निम्मा संघ 65 धावात गारद झाला होता. त्यामुळे आता कांगारूंना सावरण्याची जबाबदारी मार्कस स्टॉयनिसवर आली. मात्र रबाडाच्या गोलंदाजीवर तो 5 धावा करून माघारी परतला. मात्र तो ज्या प्रकारे बाद झाला त्यामुळे वादंग निर्माण झाला.

सामन्याच्या 17 व्या षटकात कगिसो रबाडाने स्टोयनिसला एक बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकला. हा चेंडू पडून स्टॉयनिसच्या पॅडच्या दिशेने जात होता. हा चेंडू फ्लिक करण्याचा स्टॉयनिसने प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही.

चेंडू थेट किपरच्या दिशने जाऊ लागला होता. विकेटकिपर डिकॉकने दूर चाललेला चेंडू अप्रतिम डाईव्ह मारत पकडला आणि जोरदार अपिल केली. अखेर आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आफ्रिकेला रिव्ह्यू घ्यावा लागला.

या रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टॉयनिसच्या पॅडला आणि बॅटलाही लागला नव्हता. तो थेट त्याच्या ग्लोव्हला लागून डिकॉकच्या हातात विसावला होता. मात्र त्याच्या ग्लोव्हचा स्पर्श बॅटला झाला नव्हता. तरी देखील अंपायर्सनी त्याला बाद ठरवले. यानंतर स्टॉयनिसने दंगा केला.

मात्र त्याचा ग्लोव्ह हा ज्या हाताने बॅट पकडली होती त्या दुसऱ्या हाताला स्पर्श करत होता. त्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आले. आजच्या सामन्यातील हा सर्वात वादग्रस्त निर्णय ठरला. स्टॉयनिस या निर्णयावर जाम भडकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT