Mayank Agarwal scores double century in 1st test against South Africa
Mayank Agarwal scores double century in 1st test against South Africa  
क्रीडा

INDvsSA : द्रविडची शिकवण कधीच वाया जात नाही; मयांकचे द्विशतक

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : कर्नाटकचा सलामीवीर असणाऱ्या मयांक अगरवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार आणि संयमी द्विशतक झळकाविले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आज उपहारापूर्वी शतक झळकाविले आणि त्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करत द्विशतक ठोकले.  

पृथ्वी शॉने कसोटी पदार्पणातच शतक झळकाविले आणि त्यामुळे भारताच्या सलामीचा प्रश्न कायमचा मिटला असे वाटले. या सुखात भारतीय संघ काही काळ राहतो तर पृथ्वी शॉ जखमी झाला आणि संघाबाहेर गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात खेळायचं आणि फॉर्मात असलेला सलामीवीर जखमी. अशा अवघड परिस्थितीत भारताने देशांतर्गत क्रिकेटमगध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या मयांकला संधी देण्यात आली. 

भव्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी पदार्पण करत मयांकने 76 धावा केल्या. त्यानंतर त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतक झळकाविली. अखेर आज त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले आणि पाहता पाहता त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. 

त्याने उपहारापूर्वी 204 चेंडूंत शतक ठोकले आणि त्यानंतर पुढील शंभर धावांसाठी त्याने 154 चेंडू खेळले. त्याच्या द्विशतकी खेळीत त्याने 22 चौकार आणि पाच षटकार ठोकले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT