Deodhar Trophy  
क्रीडा

Deodhar Trophy: दक्षिण विभागाला विजेतेपद! मयंक अग्रवालची कॅप्टन्स इंनिंग, तर रोहनचे दमदार शतक

दक्षिण विभागाला विजेतेपद! पूर्व विभागावर मात

सकाळ ऑनलाईन टीम

Deodhar Trophy : दक्षिण विभागाने गुरुवारी देवधर क्रिकेट करंडकाच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. रोहन कुन्नूम्मल याचे धडाकेबाज शतक, कर्णधार मयांक अगरवाल व नारायण जगदीशन यांची दमदार अर्धशतके आणि सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर दक्षिण विभागाने अंतिम फेरीच्या लढतीत पूर्व विभागावर ४५ धावांनी मात केली आणि झळाळता करंडक पटकावला.

दक्षिण विभागाकडून पूर्व विभागासमोर ३२९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. वासुकी कौशिक व विदवाथ कावेरप्पा यांनी छान गोलंदाजी केल्यामुळे पूर्व विभागाची ३ बाद १४ धावा अशी अवस्था झाली. त्यानंतर सुदीप घरामीने ४१ धावांची, सौरभ तिवारीने २८ धावांची खेळी केली.

रियान पराग व कुमार कुशाग्र या जोडीने पूर्व विभागाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. रियानने ६५ चेंडूंमध्ये ८ चौकार व ५ षटकारांसह ९५ धावांची खेळी साकारली. कुशाग्रने ५८ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी केली. पण अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने या दोन्ही फलंदाजांना निर्णायक क्षणी बाद करीत दक्षिण विभागासाठी मौल्यवान कामगिरी केली. पूर्व विभागाचा डाव २८३ धावांवर आटोपला.

धडाकेबाज सलामी भागीदारी

दरम्यान, याआधी दक्षिण विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहन कुन्नूम्मल व कर्णधार मयांक अगरवार या सलामी जोडीने १८१ धावांची शानदार भागीदारी करीत संघ व्यवस्थापनाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. दोघांनी पूर्व विभागाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहन याने ७५ चेंडूंमध्ये ११ चौकार व ४ षटकारांसह १०७ धावांची खेळी साकारली. मयांकने ६३ धावा फटकावल्या. उत्कर्ष सिंहने दोघांना बाद केले. त्यानंतर नारायण जगदीशनने ५४ धावांची आणि रोहित रायुडूने २६ धावांची खेळी केली. साई किशोर याने अखेरच्या षटकांत चमक दाखवत नाबाद २४ धावा केल्या. दक्षिण विभागाने ८ बाद ३२८ धावा फटकावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT