क्रीडा

CSK चा धडाकेबाज खेळाडू कसोटी सामन्यातून निवृत्त

नामदेव कुंभार

चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाचा धडाकाबाज अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याला दुजोरा दिला आहे. 34 वर्षीय अष्टपैलू मोईन अली याने इंग्लंड संघाचं आतापर्यंत 64 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. या धाकड अष्टपैलू खेळाडूने यादरम्यान 2914 धावा चोपल्या तर 195 विकेट घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेट अविश्वसनीय आहे. तुमचा फॉर्म चांगला असेल तर इतर कोणत्याही प्रकारापेक्षा कसोटी क्रिकेट उत्तर आहे. कसोटीमधून तुम्हाला खूप काही शिकायला आणि चाहत्याचं तितकेच प्रेमही मिळतं. कसोटी क्रिकेट खेळण्याचा मी आनंद घेतला आहे. पण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणं आता शक्य वाटत नाही. सध्याच्या क्रिकेटमध्ये फिटनेस महत्वाची आहे. त्यामुळे मर्यादीत सामन्यांचा आनंद घेण्यासाठी कसोटीतून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. पुढील आठ ते दहा वर्ष मी मर्यातीत क्रिकेट सामने खेळेल, अशी आपेक्षा आहे, असं मोईन अली याने निवृत्तीनंतर सांगितलं.

2014 मध्ये मोईन अली याने श्रीलंका संघाविरोधात इंग्लंडच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. आपल्या करियअरमध्ये मोईन अली याने पाच वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तर पाच शतके आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत. मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी तो एकदिवसीय आणि टी-20 सामन्यातून इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. वाढत्या क्रिकेट आणि क्वारंटाइनच्या कालावधीमुळे मोईन अलीने निवृत्तीची घोषणा केली आहे.

एकदिवसीय आणि टी-20 सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मोईन अली याने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT