क्रीडा

मोहम्मद कैफनं रोहित शर्माशी हस्तांदोलन करण्याऱ्यांना दिला इशारा

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्याने जरी रोहितवर टीका केली नाही तर खेळाडूंना त्याच्याशी हस्तांदोलन करताना सांभळून राहण्याचा सल्ला दिला आहे. रोहित शर्माने जेव्हापासून भारतीय संघाचे नेतृत्व (Captaincy) हातात घेतले आहे तेव्हापासून भारताच्या विजयाचा सूर्य मावळतीकडे झुकलेलाच नाही. भारताने एकही टी 20 सामना गमावलेला नाही. रोहितच्या कॅप्टन्सीवर, संघ निवडीवर बदली खेळाडू तयार करण्याच्या रणनीतीवर माजी खेळाडू जाम खूष आहेत. रोहितने वेस्ट इंडीज पाठोपाठ आता श्रीलंकेविरूद्धची टी 20 मालिका देखील खिशात टाकली आहे.

दरम्यान, कॅप्टन रोहितच्या या कामगिरीवर जाम खूष असलेल्या मोहम्मद कैफनं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये कैफ म्हणतो की, 'रोहित शर्माशी संध्याच्या काळात हस्तांदोलन करताना जरा सांभाळून कारण तो ज्या कोणत्या गोष्टीला हात लावतोय त्याचं सोनं होत आहे. श्रेयसला नंबर तीन वर फलंदाजीला पाठवणं, खेळाडूंचे रोटेशन, गोलंदाजीतील बदल त्याचे प्रत्येक पाऊल मास्टर स्ट्रोक.'

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने मोक्याच्या वेळी गोलंदाजीत चांगले बदल करून श्रीलंकेला 184 धावात रोखले. त्यानंतर फलंदाजी करताना त्याने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करून हे आव्हान 18 षटकाच पार केले. दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहितने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. तर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या संधी दिली. अय्यरने 74 धावांची मॅच विनिंग खेळी केली. तर जडेजाने 18 चेंडूत 45 धावा ठोकून भारताचा विजय सोपा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT