Mohammed Shami sakal
क्रीडा

Mohammed Shami : T-20 मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमीला कोरोनाची लागण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का

Kiran Mahanavar

Mohammed Shami Corona Positive : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून (20 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्याला आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. रिपोर्टनुसार तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला T-20 सामना 20 सप्टेंबरला मोहाली येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया शनिवारी मोहालीला पोहोचल्यानंतर शमीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटशी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली कांगारू संघाने मोहालीत पोचून सरावही सुरू केला आहे.

मोहम्मद शमीचा आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 संघात स्थान मिळाले होते. शमीने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात खेळला होता. जवळपास वर्षभरानंतर तो T20 मध्ये पुनरागमन करणार होता. टी-20 विश्वचषकातील 5 सामन्यात त्याने 6 विकेट घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पहाटे गारवा, दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा चटका, बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?

Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा: बाळासाहेब थोरात; अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

सलमानच्या गाजलेल्या तेरे नामचा सिक्वेल येणार ? निर्माते म्हणाले..

चांदी बाजारात खळबळ, भारताच्या प्रचंड मागणीमुळे संकट; ४५ वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती, एका दिवसात ७ हजाराने घसरण

INDW vs ENGW : लढूनही हरल्या...! वर्ल्ड कपमधील पराभव स्मृती मानधनाच्या जिव्हारी लागला; अश्रू आलेच होते, पण...

SCROLL FOR NEXT