Mohammed Siraj Stunning Catch 
क्रीडा

WI Vs IND 1st Test: आरा रा रा रा खतरनाक! दुखापतीची पर्वा न करता सिराजने हवेत घेतला अफलातून एकहाती कॅच

रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजची अवस्था खूपच खराब केली अन्...

Kiran Mahanavar

WI Vs IND 1st Test : भारत वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरुवात झाली. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजची अवस्था खूपच खराब केली.

पहिल्या कसोटीत चहापानानंतर वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात भारताने एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत नवोदित यशस्वी जैस्वालने नाबाद 40 आणि कर्णधार रोहित शर्माने 30 धावा केल्या होत्या.(Mohammed Siraj Stunning Catch)

उपाहारापूर्वी रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेटही आली. यात जडेजाचा जेवढा हात होता, तेवढाच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही वाटा होता. मिडऑफवर तैनात असलेल्या सिराजने हवेत उडत एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा झेल टिपताना त्याच्या हाताच्या कोपऱ्यात दुखापत झाली. पण, त्याने चेंडू मुठीतून निसटू दिला नाही.

सिराजने हा झेल वेस्ट इंडिजच्या डावातील 28व्या षटकात घेतला. रवींद्र जडेजा ही ओव्हर्स टाकत होता. त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जर्मेन ब्लॅकवुडने मिड-ऑफवर एरियल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू त्याच्या बॅटवर आला नाही आणि हवेत मिड-ऑफच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत सिराजने मागे उडी मारून एका हाताने झेल पकडला. सिराजचा हा शानदार झेल पाहून टीम इंडियाचे खेळाडूही खूश झाले. हा झेल पकडल्यानंतर सिराज काही वेळ जमिनीवर पडून होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT