क्रीडा

MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती

Kiran Mahanavar

Mahendra Singh Dhoni Announcement : टीम इंडियाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवले. येत्या टी-20 वर्ल्डकप साठी धोनीने एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. पण असे काहीही झाले नाही आणि धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

धोनीने ओरियो बिस्किट लाँच केले आहे. याबाबत त्यांनी एका व्हिडिओद्वारे हे माहिती दिली. धोनी म्हणतो की, हे बिस्किट 2011 मध्ये भारतात आले तेव्हा टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. आता पुन्हा एकदा ओरियो भारतात लाँच होत आहे, त्यामुळे या वेळेचा वर्ल्ड कपही आपणच जिंकणार आहे. धोनीने केसांची रचना तशीच ठेवली आहे, तो विनोद असला तरी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा कोणतीही पत्रकार परिषद घेतली नव्हती.

टीम इंडियाच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपल्या सोशल मीडिया पेजवर 25 सप्टेंबरला लाईव्ह येणार असल्याचे सांगितले होते. यानंतर चाहत्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीचा अंदाज लावला. पण अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. एमएस धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरीही तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्सचा तो कर्णधार आहे.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याची गणना क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून केले जाते. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिला आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT