mumbai half marathon women amrita patel rank 1st and buldhana poonam sonu rank 2nd Sakal
क्रीडा

Mumbai Half Marathon : एकसारखीच वेळ...तरीही बुलडाण्याची पूनम दुसरी;अर्धमॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक थोडक्यात हुकला

मुंबईत पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनमधील महिला विभागात दोन खेळाडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील बुलडाण्यामधील पूनम सोनूने व अम्रिता पटेल यांनी १ तास १९ मिनिटे व २० सेकंद अशी एकसारखीच वेळ देत अर्धमॅरेथॉन शर्यत पूर्ण केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनमधील महिला विभागात दोन खेळाडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील बुलडाण्यामधील पूनम सोनूने व अम्रिता पटेल यांनी १ तास १९ मिनिटे व २० सेकंद अशी एकसारखीच वेळ देत अर्धमॅरेथॉन शर्यत पूर्ण केली; पण अम्रिता हिला पहिला क्रमांक व पूनम हिला दुसरा क्रमांक देण्यात आला.

या शर्यतीमध्ये कविता यादव हिने १ तास २० मिनिटे व ४५ सेकंद अशी वेळ देत शर्यत पूर्ण केली व तिसरे स्थान मिळवले. नाशिकमध्ये विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. सध्या दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री व आशियाई स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.

तसेच रेल्वेमध्ये क्लार्कची नोकरी करीत आहे, असे पूनमने `सकाळ`शी बोलताना सांगितले. दरम्यान, महिला अर्धमॅरेथॉनमध्ये पहिल्या क्रमांकासाठी एक लाखांचे, तर दुसऱ्‍या क्रमांकासाठी ७५ हजारांचे बक्षीस होते; पण फोटो फिनिशमध्ये अम्रिता हिने पहिले स्थान मिळवल्याचे दिसल्यामुळे तिला या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. पूनमला ७५ हजारांचे बक्षीस मिळाले.

तांत्रिक अधिकारी होमियार मिस्त्री यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नियम दोन खेळाडूंनी शर्यत पूर्ण केल्याची वेळ एकसारखीच असल्यास फिनिश लाईनला कोणत्या खेळाडूचा स्पर्श आधी झाला ते बघितले जाते. त्यानुसार क्रमांक ठरवले जातात.

तसेच मानेपासून कमरेपर्यंत एखाद्या अवयवाचा स्पर्श लागणे आवश्यक असते. डोके, हात आणि पाय यांच्यापैकी एकाही अवयवाचा स्पर्श फिनिश लाईनला व्हायला नको. असा स्पर्श गृहीत धरला जात नाही.

दोन खेळाडूंची शर्यत पूर्ण करण्याची वेळ एकसारखीच असल्यास त्या दिवशी प्रोव्हिजनल निकाल लावण्यात येतो; पण काही कालावधीनंतर आयोजकांकडून पुन्हा एकदा चित्रफीत बघितली जाते. त्यानंतर अंतिम निर्णय देण्यात येतो.

परभणीचा किरण म्हात्रे दुसरा

पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातील परभणीतील किरण म्हात्रे याने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने एक तास, सहा मिनिटे व २३ सेकंदात शर्यत पूर्ण केली. सावन बरवाल याने एक तास, पाच मिनिटे व सात सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि पहिल्या स्थानावर झेप घेतली.

मोहन सैनी याने एक तास, सहा मिनिटे व ५५ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान पटकावले. किरण आपला भाऊ, बहीण व आजीसोबत वास्तव्य करतो. गावी सोयाबीन व हरभरा यांची शेती केली जाते. याची देखभाल भाऊ करतो. किरण लष्करात नोकरीला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अचानक छापा

SCROLL FOR NEXT