क्रीडा

Lasith Malinga : बॉलिंग कोच बदलला...! रोहित शर्माच्या गोलंदाजांना मिळाली धार

Kiran Mahanavar

Mumbai Indians announce MI Legend Lasith Malinga as Bowling Coach : आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या कोचिंग विभागात मोठा बदल केला आहे. संघाने वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी संघ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मार्क बाउचर आणि त्याचा माजी सहकारी किरॉन पोलार्डसोबत काम करेल.

आता कर्णधार रोहित शर्मासह मलिंगा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला अधिक धार देईल. यापूर्वी, लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कसाठी गोलंदाजी कोच आणि SA20 मध्ये MI केपटाऊनसाठी गोलंदाजी कोच म्हणून काम केले आहे.

लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे आणि MI न्यूयॉर्क आणि MI केपटाऊन नंतर #OneFamily मध्ये माझा प्रवास सुरू ठेवणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. मी मार्क, पॉली, रोहित आणि बाकीच्या टीमसोबत, विशेषत: बॉलिंग युनिटसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

त्याच्या काळात लसिथ हा सर्वात घातक गोलंदाज होता. अनेक प्रसंगी त्याने आपल्या गोलंदाजीने विजेतेपद आणि निर्णायक गेम जिंकले आहेत आणि महत्त्वाच्या वेळी त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. 2008 मध्ये एमआयकडून पदार्पण करणाऱ्या मलिंगाने 13 वर्षे संघासाठी गोलंदाजी केली. या काळात त्याने 122 सामने खेळले ज्यात त्याने 170 विकेट घेतल्या.

लसिथ मलिंगा याआधी आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. मात्र, आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी त्याने संघ सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT