Mumbai-Indian-Baby-Girl 
क्रीडा

'मुंबई इंडियन्स'चा स्टार खेळाडूला कन्यारत्न; फोटो केला पोस्ट

विराज भागवत

गोंडस Video अन् फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर

मुंबई इंडियन्सकडून खेळलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन आणि त्याची पत्नी जॉर्जिया यांना कन्यारत्न प्राप्ती झाली. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मिचेलने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. इन्स्टाग्रामवर आपल्या बाळाची एक गोंडस व्हिडीओ त्याने शेअर केली. मंगळवारी त्याने आपल्या अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

मिचेल मॅक्लेनेघन IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघातून खेळताना जॉर्जिया अनेकदा त्याला भेटण्यासाठी भारतात आली. या दोघांनी त्यांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. मिचेल आणि जॉर्जिया दोघांनी ऑगस्ट २०१९मध्ये साखरपुडा केला होता. मॅक्लेनेघन दीर्घ कालावधीपासून जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळीच त्यांनी साखरपुडा करून चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी लग्न केले. आपल्या नव्या बाळाचं नाव त्यांना कोब हार्पर मॅक्लेनेघन असं ठेवलं.

मिचेल मॅक्लेनेघनने IPL मध्ये २०१५ ते २०१९ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. या कालावधीत त्याने ५६ सामन्यांमध्ये ७१ गडी माघारी धाडले. मुंबईच्या संघात दाखल झाल्यापासून २०१८पर्यंत तो संघाचा स्टार गोलंदाज होता. जसप्रीत बुमराहसोबत त्याला सलामी गोलंदाज म्हणून संघात मान होता. पण २०१९मध्ये ट्रेंट बोल्ट आल्यानंतर हळूहळू त्याला संघातून वगळण्यात आले. २०२० मध्ये त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

Kolhapur Bus Tragedy : जिथं पत्नी-मुलांना गमावलं... तिथंच पुण्यातील विराट यांनी संपवलं आयुष्य; कोल्हापूरातील घटना डोळ्यात पाणी आणणारी

Vasai: अमली पदार्थ तस्कारांची धरपकड! वसई, मिरा-भाईंदर शहरातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

SCROLL FOR NEXT