Murali Sreeshankar knee surgery successful in Doha Sakal
क्रीडा

Murali Sreeshankar : मुरली श्रीशंकरच्या गुडघ्यावर डोहामध्ये यशस्वी शस्त्रकिया

भारताचा लांब उडीतील खेळाडू मुरली श्रीशंकरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचा लांब उडीतील खेळाडू मुरली श्रीशंकरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीमुळे त्याला जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस मुकावे लागणार आहे.

आशिया आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या श्रीशंकरच्या गुडघ्यावर दोहामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. ब्रुनो ऑलोरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचे ठरले, अशी भावना मुरलीने व्यक्त केली. १८ तासानंतर मी चालू शकेन, असेही तो सोशल माध्यमावर व्यक्त होताना म्हणाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला सराव करताना श्रीशंकरचा गुडघा दुखावला होता. बँकॉक जुलै २०२३ मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून श्रीशंकर पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरला होता. ८.२७ मीटर हा ऑलिंपिक पात्रता निकष होता; परंतु श्रीशंकरने ८.३७ मीटर अशी कामगिरी केली होती. गेल्या वर्षी जून महिन्यातील डायमंड लीग स्पर्धेत तो तिसरा आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT