N Srinivasan Makes Massive Comment On MS Dhonis Future in IPL 2020 
क्रीडा

धोनीकडून CSK चे कर्णधारपदही जाणार? मालक म्हणतात..

वृत्तसंस्था

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीत. अशातच आता तो कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनीवासन यांनी धोनीच्या ऐयपीएलमधील भविष्याबाबत मोठी टिपण्णी केली आहे. 

श्रीनीवासन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीवर काही भाष्य केले नसले तरी पुढील मोसमात म्हणजेच 2020 मधील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद धोनीकडेच असणार याची खात्री दिली आहे. 

''मी फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की धोनीच पुढील वर्षी चेन्नईचा कर्णधार असेल,'' अशी ग्वाही त्यांनी सर्व चाहत्यांना दिली.

विश्वकरंडकानंतर धोनीने निवृत्ती जाहीर करावी अशी मागणी सर्वस्तरातून होत असताना त्याने दोन मिहन्यांची युची घेत लष्करात सेवा करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्यासोबत एक फोटो शेअर केल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा जोर आला. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तो निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले. 

2016मध्ये झालेल्या ट्वेंटी20 विश्वकरंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील धोनीचा आणि त्याचा फोटो कोहलीने शेअर केला होता. या सामन्यात धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. त्यामुळे कोहलीची पुरती दमछाक झाली होती. त्यामुळेच सामन्यानंतर कोहलीनं खेळपट्टीवर गुडघे टेकले.याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं शेअर केला होता. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.'' कोहलीच्या या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीचा चर्चांना वेग आला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनेही याबाबत खुलासा केला होता. ''माझ्या मनात लांब लांबपर्यंत हा विचारही नव्हता. धोनी निवृत्ती घेतोय हा विचारही मी केला नव्हता. मी घरात बसलो होते आणि मला फक्त त्या सामन्याची आठवण आली त्यामुळे मी सहज फोटो शेअर केला. मात्र, लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ लावला,'' असे स्पष्टीकरण त्याने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT