New Zealand vs Sri Lanka World Cup 2023
New Zealand vs Sri Lanka World Cup 2023 
क्रीडा

NZ vs SL World Cup 2023 : न्यूझीलंडने श्रीलंकेचा केला पराभव अन् पाकिस्तानला दिला धक्का!

Kiran Mahanavar

New Zealand vs Sri Lanka World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना खेळल्या गेला. ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने लंकेचा 5 गडी राखून पराभव केला. बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम श्रीलंकेला केवळ 171 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 24 षटकांत हे लक्ष्य गाठले. यासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.

या विजयासह न्यूझीलंडचे गुणतालिकेत 10 गुण झाले आहेत. किवी संघाचा नेट रनरेट चांगला आहे. न्यूझीलंडच्या या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास पल्लवित झाल्या आहेत. आता एखादा चमत्कारच पाकिस्तानला 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत घेऊन जाईल. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाकिस्तानपेक्षा वाईट आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेकडून बंगळुरूच्या छोट्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर धावांचा पाऊस पडले असे चाहत्यांना वाटत होते, पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. सौदीने त्याला आऊट केले.

यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कर्णधार मेंडिस सहा धावा करून बाद झाला. तर समरविक्रमा एक आणि चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पण दुसऱ्या टोकाला असलेला कुसल परेरा मात्र पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात वैयक्तिक 51 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या 74/5 झाली.

यानंतर धावांचा वेग कमी झाला, पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज 16, धनंजय डी सिल्वा 19, चमिका करुणारत्ने 6 तर दुष्मंथा चमीराने 1 धावा करून बाद झाला. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत 43 धावांची भागीदारी करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 23.1 षटकात 5 विकेट गमावत 172 धावा करत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेने 45, डॅरिल मिशेलने 43 आणि रचिन रवींद्रने 42 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 17 धावा करून नाबाद राहिला. केन विल्यमसनने 14 धावा केल्या. मार्क चॅपमन सात धावा करून बाद झाला. टॉम लॅथमने नाबाद 40 धावा केल्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने दोन बळी घेतले. महिश तिक्ष्ण आणि दुष्मंथा चमेरा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT