विराट कोहली  Esakal
क्रीडा

विराटचे कर्णधारपद गेल्यानंतर नितीन राऊतांचे ट्वीट चर्चेत

क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना!”

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाचा (India Cricket Team) खेळाडू विराट कोहलीकडून (Virat Kohali) वन-डे टीमचे कर्णधारपद (BCCI Removed Captaincy from virat kohali ) काढून घेण्यात आल्यानंतर त्याचा फॉर्म, नेतृत्वगुण आदींबाबत आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात केलेले ट्वीटदेखील चर्चेत आले आहे.

विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर चाहत्यांचा वाढता रोष लक्षात घेत ‘बीसीसीआय’ने भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आणि त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीची प्रशंसा केली आहे. अध्यक्ष सौरव गांगुलीने मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत, हे निवड समितीचे धोरण असल्याचे मत मांडले आहे.

मात्र, तरी नितीन राऊत यांना मात्र यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय येत आहे. “पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की, त्याचे कर्णधारपद जाणार आहे, असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले आहे. तसेच क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना!” असेदेखील राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शमीच्या पाठीशी उभा राहिला होता कोहली

टी-20 वर्ल्डकपमध्ये सलामीच्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती, तसेच क्रिकेटपटू मोहम्मद शमीलादेखील त्याच्या धर्मावरून ट्रोल केले जात होते. यावेळी विराट कोहली शमीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT