Australia open 2023 esakal
क्रीडा

Australia open 2023: नोवाक जोकोविचकडून प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा

नोवाक जोकोविचने प्रतिस्पर्ध्याला सहज नमवले.

सकाळ डिजिटल टीम

राफेल नदालला लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील दुसऱ्या दिवशी अँडी मरे व अॅलेक्झँडर झ्वेरेव यांना पुरुषांच्या एकेरीत विजयासाठी कमालीची झुंज द्यावी लागली. दोघांनाही पाच सेटच्या भरानंतर विजय मिळवता आला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मात्र प्रतिस्पर्ध्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळविला.(Novak Djokovic R1 win at Australian Open 2023 )

अँडी मरे मॅटीयो बेरेट्टीनी यांच्यामध्ये रोमहर्षक लढत झाली. पहिल्या दोन सेटमध्ये मरे याने ६-३, ६-३ असे यश मिळवले; मात्र पुढील दोन सेटमध्ये इटलीच्या बेरेट्टीनी याने ६-४, ७-६ अशी बाजी मारली. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये मरे याने आपला खेळ उंचावला. त्याने ७-६ असा हा सेट जिंकत पुढील फेरीत पाऊल ठेवले.

अॅलेक्झँडर झ्वेरेव व जुआन पाब्लो वारीलास यांच्यामधील लढतही थरारक झाली. झ्वेरेव याला मागील वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमच्या सलामीच्या लढतीत तो पराभवापासून थोडक्यात बचावला.

जुआन याने पहिला सेट ६-४ असा जिंकला. त्यानंतर झ्वेरेव याने ६-१ असे पुनरागमन केले. पण जुआन याने तिसरा सेट ७-५ असा जिंकत या लढतीत २-१ असे पुढे पाऊल टाकले. झ्वेरेव याने अखेरच्या दोन सेटमध्ये सर्वस्व पणाला लावले. त्याने चौथ्या सेटमध्ये ७-६ असे आणि पाचव्या सेटमध्ये ६-४ असे यश संपादन केले आणि आगेकूच केली.

नोवाक जोकोविचने प्रतिस्पर्ध्याला सहज नमवले. त्याने रॉबर्टो बेईना याच्यावर सरळ तीन सेटमध्ये मात केली. जोकोविच याने या लढतीत ६-३, ६-४, ६-० असा विजय नोंदवला. त्याने दोन तास व दोन मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याचे आव्हान संपुष्टात आणले. मागील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला सहभागी होता आले नव्हते.

रुबलेवकडून थीमचा पराभव

रशियाच्या आंद्रेय रुबलेव याने डॉमिनिक थीम याचा पराभव केला. पाचव्या मानांकित रुबलेव याने थीमचा ६-३, ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला. दोन तास व दहा मिनिटांत थीमचा खेळ खल्लास झाला. याशिवाय टेलर फ्रीटझ, अॅलेक्स दी मिनॉर, होल्गर रुन, ग्रिगॉर दीमित्रोव व पाब्लो बुस्टा यांनी पुरुषांच्या एकेरीत विजय मिळवत आगेकूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT