Novak Djokovic US Open Tennis Participation In Danger Due To Corona Unvaccinated  esakal
क्रीडा

COVID-19 Vaccine : लसीकरण न झालेला नोव्हाक US Open ला देखील मुकणार?

अनिरुद्ध संकपाळ

सिनसिनाटी : आजापर्यंत 21 ग्रँडस्लॅम टायटल जिंकणाऱ्या नोव्हाक जोकेविचने (Novak Djokovic) सिनसिनाटी हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेतून (Cincinnati Tournament) माघार घेतली आहे. कोरोना लसीकरण (Corona Vaccination) न झाल्याने जोकोविचला अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र यामुळे याच महिन्यात 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या युएस ओपन (US Open) ग्रँडस्लॅम स्पर्धेलाही जोकोविच मुकणार असल्याच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सर्बियाच्या नोव्हाक जोकविचने आतापर्यंत 21 ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. तो राफेल नदालच्या 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमापासून एक ग्रँडस्लॅम दूर आहे. दरम्यान, जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्याचे सांगितले. यामुळे त्याला काही महत्वाच्या स्पर्धांना देखील मुकावे लागले. त्याला जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला. त्याला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मायदेशी परत पाठवण्यात आले. आता त्याच्या युएस ओपनमधील सहभागाबाबत देखील साशंकता निर्माण झाली आहे.

अमेरिका आणि कॅनडाच्या सध्याच्या नियमानुसार ज्या विदेशी नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले नाही त्यांना या दोन देशात प्रवास करण्यास बंदी आहे. दरम्यान, सिनसिनाटी स्पर्धा आयोजकांनी प्रसिद्ध पत्रक काढून जाहीर केले की नोव्हाक जोकोविचने या स्पर्धेतून प्रवासासंबंधी बंधानांमुळे माघार घेतली आहे.

मात्र जोकोविचने युएस ओपनमध्ये सहभाग घेण्याबाबत आजून आपण आशावादी असल्याचे सांगितले. मात्र यासाठी सरकारने आपल्या कोरोना लसीकरण धोरणामध्ये बदल करणे गरजेचे आहे. युएस टेनिस असोसिएशनला अमेरिकेच्या कोरोना लसीकरणाबाबतच्या नियमांचे पालन करावेच लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT