On This Day Terrorist Attack on Sri Lanka Cricket Team In Pakistan
On This Day Terrorist Attack on Sri Lanka Cricket Team In Pakistan  esakal
क्रीडा

आजच्या दिवशी पाकिस्तानातून क्रिकेटचा बाजार उठला होता!

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) इतिहासात 3 मार्च या तारखेला विशेष महत्व आहे. कारण 3 मार्च 2009 ला श्रीलंकेच्या क्रिकेट (Sri Lanka Cricket Team) संघावर दहशतवाद्यांनी गोळीबार (Terrorist Atack) केला होता. यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटचा बाजार उठला. संपूर्ण क्रिकेट जगताने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला. तब्बल दशक उलटून गेल्यानंतर आता पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Internation Cricket) हळूहळू पूर्ववत होत आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या लंकन संघ ज्या बसमधून प्रवास करत होती त्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनने संपूर्ण जग हादरून गेले होते. काही खेळाडू जखमी देखील झाले.

2009 ला श्रीलंका पाकिस्तान दौऱ्यावर (Sri Lanka Tour of Pakistan 2009) होती. त्यांचा संघ बसमधून लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमकडे जात होती. दरम्यान, दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबारात श्रीलंकेचे 6 खेळाडू जखमी झाले होते. तर पाकिस्तानचे 6 पोलीस आणि दोन सामन्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता. गद्दाफी स्टेडियमजवळ (Gaddafi Stadium) दोन गाड्यांमधून जवळपास 12 दहशतवादी पोहचले होते. त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली होती. या दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचर आणि हँड ग्रेनेडचा देखील या हल्ल्यात वापर केला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा हल्ला परतवून लागवत श्रीलंकन संघाला सुरक्षित ठेवले.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानची प्रतिमा डागळली. जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. या हल्ल्यानंतर श्रीलंकेचा संघ त्वरित पाकिस्तान सोडून मायदेशात परतला होता. मैदानातच त्यांच्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पाचारण केले होते. यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Internation Cricket) खेळले गेले नाही. पाकिस्तानने नंतर युएईला आपले होम ग्राऊंड केले. गेल्या दोन वर्षात इतर देशांचे संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास तयार होत आहेत. 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते कसोटी, टी 20, वनडे मालिका खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT