PAK vs ENG
PAK vs ENG esakal
क्रीडा

PAK vs ENG : लावा ताकद! पाकला सेमी फायनल गाठण्यासाठी 6.2 षटकात इंग्लंडचं 'अवाढव्य' आव्हान करावं लागणार पार

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Vs England World Cup 2023 Semi Final : इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान या वर्ल्डकप 2023 मधील औपचारिक्ता म्हणून खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत 50 षटकात 9 बाद 337 धावा केल्या. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक हरली अन् त्यांचं सेमी फायनल गाठण्याची 0.001 टक्के राहिलेली आशा देखील मावळली.

मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कर्णधारानं नाणेफेकीनंतर आमची गोलंदाजी बघाच असं छाती बाहेर काढून सांगितलं होतं. मात्र त्याची छाती त्याच्याच गोलंदाजांनी आत घालवून टाकली.

आता पाकिस्तानला सेमी फायनल गाठायची असेल तर हे आव्हान 6.2 षटकात पार करावं लागणार आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 84 तर जो रूटने 60 धावांची खेळी केली. मात्र इंग्लंडच्या आक्रमकतेला चार चांद तर हॅरी ब्रूकने लावले.

ब्रूकने 17 चेंडूत 30 धावा ठोकत इंग्लंडच्या मंदावलेल्या धावगतीला वेग दिला अन् 300 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याने पाकिस्तानचे प्रमुख अस्त्र शाहीन अफ्रिदीला 45 व्या षटकात चांगलाच चोप दिला. त्याने या षटकात 20 धावा वसूल केल्या. यामुळे 42.2 षटकात 5 बाद 257 वरून 46.4 षटकात इंग्लंड 302 धावांपर्यंत पोहचली. त्यानंतर डेव्हिड विलीने 2 चौकार आणि 1 षटकार मारत 5 चेंडूत 300 च्या स्ट्राईक रेटने 15 धावा ठोकल्या. या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर (Pakistan Cricket Team) 338 धावांचे आव्हान ठेवले.

आजच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आमच्याकडे दर्जेदार गोलंदाज आहेत आम्ही इंग्लंडला स्वस्तात गुंडाळण्यासाठी जोर लावू असे सांगितले होते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात बरोबर उलटे काम केले. त्यांनी धावांची खैरात वाटत इंग्लंडला सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी दिली.

पाकिस्तानचे प्रमुख अस्त्र शाहीन खानने तर 10 षटकात 72 धावा दिले. त्याने रूट आणि बेन स्टोक्सची विकेट घेतली. मात्र ब्रूकने त्याची इकॉनॉमी एकाच षटकात बिघडवली. त्याने अफ्रिदी टाकत असलेल्या 45 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत स्ट्राईक आपल्याकडेच ठेवले. तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारत अफ्रिदीची बोलती बंद केली.

यानंतर पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेत ब्रूकने स्ट्राईक बटलरकडे दिले. मात्र त्यानेही पाचव्या चेंडूवर एक धाव घेत षटकाचा शेवटचा चेंडू खेळण्याची संधी ब्रूकला दिली. त्याने या संधीचं सोनं करत षटकार मारला अन् शाहीनच्या एकाच षटकात 20 धावा वसूल केल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT