Pakistan Shahid Afridi Holds Most Duck Record In T20 World Cup
Pakistan Shahid Afridi Holds Most Duck Record In T20 World Cup  esakal
क्रीडा

T20 World Cup 10 Records : आफ्रिदी हास्यास्पद 'विक्रमवीर' तर T20 वर्ल्डकप विक्रमांवर गेलचंच राज्य

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup Records Shahid Afridi Chris Gayle : आयसीसीच्या टी 20 वर्ल्डकप 2023 ला ऑस्ट्रेलियात सुरूवात झाली आहे. हा आतापर्यंतचा 8 वा टी 20 वर्ल्डकप आहे. 2007 पासून सुरूवात झालेल्या या टी 20 वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. काही विक्रम हे पहिल्याच वर्ल्डकपमध्ये झाले आणि ते अजूनही कोणाला मोडता आलेले नाहीत. टी 20 वर्ल्डकपच्या विक्रमांच्या यादीत वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. याचबरोबर बऱ्याच भारतीय खेळाडूंनी देखील या यादीत स्थान पटकावले आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर तर एका अप्रिय विक्रमाची देखील नोंद आहे. आपण असेच टी 20 वर्ल्डकपमधील 10 विक्रम पाहणार आहोत.

1 - ख्रिस गेलने 2016 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 48 चेंडूत शतक ठोकले होते. गेलने स्वतःचेच टी 20 वर्ल्डकप रेकॉर्ड मोडले होते.

2 - 2007 च्या पहिल्याच टी 20 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने इंग्लंविरूद्ध 12 चेंडूत अर्धशतक ठोकले. हे टी 20 वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

3 - पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर एक जबरदस्त रेकॉर्ड आहे. तो जगातील एकमेव असा फलंदाज आहे जो टी 20 वर्ल्डकपमध्ये तब्बल 5 वेळा शुन्यावर बाद झाला.

4 - ख्रिस गेलचा टी 20 मध्ये शतक ठोकण्यात कोणी हात धरू शकत नाही. त्याच्या नावावर दोन टी 20 वर्ल्डकप शतके आहेत. इतर 7 फलंदाजांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये एक शतक ठोकले आहे. मात्र दोन शतके फक्त गेलनेच ठोकली.

5 - टी 20 वर्ल्डकपमध्ये अर्धशतकांचा किंग हा 'विराट' कोहलीच आहे. त्याने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये 10 अर्धशतके ठोकली आहेत.

6 - पुन्हा एकदा ख्रिस गेल! टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील गेलच्या नावावरच आहे. त्याने 61 षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताचा युवराज सिंग आहे. त्याने 31 षटकार ठोकले आहेत.

7 - सर्वाधिक चौकार मारण्यात श्रीलंकेचा महेला जयवर्धने आघाडीवर आहे. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 111 चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.

8 - श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा विक्रम केलाय. या दोघांनी 2010 च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी रचली होती.

9 - टी 20 वर्ल्डकप इतिहासात एका विकेटकिपरने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. त्याने टी20 वर्ल्डकपमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत.

10 - टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये तब्बल 23 झेल पकडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT