क्रीडा

Pakistan Cricketer: लाइव्ह मॅच दरम्यान PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी! खेळाडू म्हणाला...

खेळाडूचा मृत्यू झाला अशी बातमी पसरताच पाकिस्तानमधील चाहत्यांनी त्याला श्रध्दांजली वाहिली

सकाळ डिजिटल टीम

जगात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या बातम्या एकदम वाऱ्यासारख्या पसरतात. त्यामध्ये किती तथ्य आहे हे पडताळून पाहिलं जात नाही. अशीच एक तथ्य नसलेली बातमी वाऱ्यासारखी पसरली ती म्हणजे पाकिस्तानच्या खेळाडूच्या मृत्यूची बातमी. नेमकी ही बातमी कुणी व्हायरल केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. दरम्यान त्या खेळाडूला ही बातमी चुकीची असल्याचं सांगावं लागलं आहे. ज्यावेळी पाकिस्तान खेळाडूने ट्विट केलं, त्यावेळी चाहत्यांनी त्या खेळाडूच्या मृत्यूची चर्चा बंद केली आहे.

अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि काही बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. ज्यांच्याबद्दल असा दावा केला जात होता की पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान शिनवारीचा मृत्यू थेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खेळाडू मैदानावर मॅच खेळत आहेत पण अचानक सगळेजण बाजूला पळू लागले. यानंतर, व्हिडिओमध्ये एक खेळाडू जमिनीवर उलटा पडलेला दिसत आहे. ज्याच्या आसपास खेळाडू आणि इतर काही लोक आहेत.

या दरम्यान पाकिस्तानचा बॉलर उस्‍मान शिनवारी याचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यावेळी त्याच्या हे कानावर गेले. त्यावेळी त्याने मी एकदम तंदुरुस्त असून पुर्णपणे ठीक आहे, तसेच मी देवाचे सुद्धा आभार मानतो असं ट्विटही केलं आहे.

लाहोरमधील चोबली टाऊन क्रिकेट मैदानावर फ्रिजलँड आणि बर्गर पेंट्स यांच्यातील लीग मॅच दरम्यान ‘शिनवारी’ नावाच्या खेळाडूचा मृत्यू झाला अशी बातमी पसरताच पाकिस्तानमधील चाहत्यांनी त्याला श्रध्दांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला मोठा धक्का? PoK ला भारताशी जोडण्याची मागणी, ११० दिवसांपासून सुरुये आंदोलन

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT