National Games  sakal
क्रीडा

Panaji : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे २५ ऑक्टोबरला उद्‍घाटन

गोव्याचे क्रीडामंत्री गावडे यांची माहिती, नऊ नोव्हेंबरला समारोप

सकाळ वृत्तसेवा

पणजी : गोव्यातील नियोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तारखांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. स्पर्धेचे २५ ऑक्टोबरला उद्‍घाटन होईल आणि सोळा दिवसीय स्पर्धेचा नऊ नोव्हेंबर रोजी समारोप होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. त्यामुळे स्पर्धा होण्याबाबतचे प्रश्नचिन्हही दूर झाले.

‘‘स्पर्धेच्या उद्‍घाटनाविषयी आम्हाला पंतप्रधान कार्यालयाने एक निश्चित तारीख पाठवण्यास सांगितले होते. आम्ही २५ ऑक्टोबरला उद्‍घाटनाची तारीख ठरवली आणि संबंधित पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयाशी केला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) दिल्लीत याप्रकरणी पाठपुरावा केला. स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून सज्जतेच्या दिशेने आहे,’’ असे क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले. स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याचे संकेत आहेत.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) स्पर्धा तांत्रिक समितीचे प्रमुख अमिताभ शर्मा यांनीही स्पर्धेचे २५ ऑक्टोबरला उद्‍घाटन होण्याबाबत दुजोरा दिला. ‘‘दसरा आणि दिवाळी यामधील कालावधीत स्पर्धेचे आयोजन व्हावे यासाठी आमचे प्रयत्न होते आणि त्यादृष्टीने

नियोजन करण्यात आले आहे,’’ असे अमिताभ म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या अध्यक्ष-सचिवांना स्पर्धेच्या नियोजित तारखेविषयी पत्र पाठवले आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

देशातील सर्वांत मोठी स्पर्धा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात गोव्यातील स्पर्धा सर्वांत मोठी असेल. प्रथमच सर्वाधिक ४३ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी गुजरातमधील ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३६ खेळ होते. गोव्यातील स्पर्धेत देशभरातील सुमारे ११ ते १२ हजार क्रीडापटूंचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती अमिताभ यांनी दिली. ‘‘गोव्यातील स्पर्धा वारसा जपणारी असेल. स्पर्धेनिमित्त साधनसुविधा भविष्यकालीन गुंतवणूक ठरतील. गोव्यातील स्पर्धेसाठी खूप पूर्वी तयारी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे आता राज्य सरकार पूर्णपणे सज्ज आहे,’’ असे अमिताभ म्हणाले.

बोधचिन्ह, शुभंकराचे अनावरण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे १४ मे रोजी; तर शुभंकर ‘मोगा’चे १८ जून रोजी शानदार कार्यक्रमात ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनावरण झाले. दोन्ही वेळेस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे यजमानपद यशस्वी ठरवण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT