Avinash Sable Olympic 2024 esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 Live : अविनाश साबळेने करून दाखवलं, तगड्या स्पर्धकांना टक्कर देत गाठली फायनल

Avinash Sable Olympic 2024 लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Avinash Sable 3000m Steeplechase - लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे लागल्या होत्या. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात तगड्या स्पर्धकांना त्याने टक्कर दिली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.

Heat 2 मध्ये अविनाश पळाला आणि त्याच्या गटात केनियाचा अब्राहम किविबोट, इथोपियाचा सॅम्युअल फिरेवू व जपानचा रियूजी मियूरा या जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या खेळाडूंचे आव्हान होते. अविनाश जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर आहे आणि ८ मिनिटे ९.९१ सेकंद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. ३ Heat मधून प्रत्येकी ५ असे १५ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरणार होते.

Avinash Sable Olympic 2024

अविनाशने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती आणि अब्राहम व सॅम्युअल त्याच्या मागोमाग होते. पण, १००० मीटर नंतर अविनाश तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला.. जपानच्या खेळाडूने अविनाशला आणखी एक स्थान मागे ढकलले. २००० मीटर अंतर संपेपर्यंत अविनाशने पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला. अब्राहम वारंवार मागे वळून जवळ येणाऱ्या अविनाशकडे पाहत होता.

मात्र, शेवटच्या लॅपची घंटा वाजली आणि अविनाश मागे पडला. पण, अविनाशने पाचव्या स्थानासह फायनलमधील आपली जागा पक्की केली. अविनाश ८ मिनिटे १५.४३ सेकंदासह फायनलमध्ये पोहोचला.

Avinash Sable Olympic 2024

अविनाशची मेहनत अन् यश...

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अविनाश खूप कष्टाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत होता. त्याची शाळा घरापासून ६-७ किलोमीटर लांब असल्याने तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याला सवय लागली. त्याचे आई-वडिल वीट भट्टी कामगार होते आणि घरातील मोठा मुलगा असल्याने अविनाशला आई- वडिलांच्या कष्टाचे मोल माहित होते. त्यामुळेच त्यानेही कॉलेज सांभाळून १०० रुपये रोजंदारीवर काम केले होते. १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला.

राष्ट्रीय विक्रम...

पटियाला येथील फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाशने सुवर्णपदकाची कमाई केली. अविनाशने ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमासह पदक मिळवले. त्याने ७ मिनिटे २०.२० सेकंदात नवा विक्रम नोंदवला. याआधी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT