argentina vs morocco 2-2 & spain beat uzbekistan by 2-1 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : युरो विजेत्या स्पेनची शानदार सुरुवात; कोपा अमेरिका विजेत्या अर्जेंटिनाची मोरोक्कोने अडवली वाट!

Paris Olympic 2024 Football Spain & Argentina : स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन तगडे संघ अनुक्रमे युरो चषक व कोपा अमेरिका स्पर्धा जिंकून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 'सुवर्ण' गोल डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरले.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Football : स्पेन आणि अर्जेंटिना यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या फळीतील खेळाडू उतरवले आहेत. स्पेनच्या संघाने क गटात विजयी सुरूवात केली, तर अर्जेंटिनाला ब गटात बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरूवात झाली. ब गटातील सामन्यात मोरोक्कोने वर्चस्व राखताना अर्जेंटिनाला जखडून ठेवले होते. रहिम सौफिन याने ४५+२ मिनिटाला मोरोक्कोला पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४९व्या मिनिटाला पेनल्टीवर आणखी एक गोल करून मोरोक्कोने अर्जेंटिनाला बॅकफूटवर फेकले. ६८ व्या मिनिटाला सिमॉन गियूलिनोच्या गोलने अर्जेंटिनाला धीर दिला. तरीही त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. ९०+१६ मिनिटाला मेडिना ख्रिस्टियनच्या गोलने अर्जेंटिनाचा पराभव टाळला. मोरोक्कोविरुद्धचा हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला.

क गटातील सामन्यात स्पेनने २-१ अशा फरकाने उझबेकिस्तानचा पराभव केला. मार्क पुबिलने २९व्या मिनिटाला स्पेनला पहिला गोल करून दिला. त्यानंतर ४५+३ मिनिटाला पेनल्टीवर एल्डर शोमुरोडोव्हने गोल करून उझबेकिस्तानला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोर लावला, परंतु ६२व्या मिनिटाला सर्गिओ गोमेझच्या गोलने स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनने ही आघाडी कायम राखताना विजय पक्का केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT