Manish Narwal Sakal
क्रीडा

Paris Paralympic 2024: मनीषने रौप्य पदकावर साधला निशाणा! भारताच्या खात्यात चौथे पदक

Manish Narwal Won Silver Medal: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत मनीष नरवालने भारतासाठी रौप्य पदक मिळवून दिले.

Pranali Kodre

India at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेतील सुरुवात भारतासाठी शानदार ठरली आहे. त्यातही शुक्रवारी भारताच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पदकांची भर पडली. भारतासाठी नेमबाज मनीष नरवाल याने रौप्य पदक जिंकले. हे भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील चौथे पदक ठरले.

मनीष नरवालने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात हे रौप्य पदक जिंकले. नेमबाजीतील भारताचे हे आत्तापर्यंतचे यंदाच्या पॅरालिम्पिकमधील तिसरे पदक आहे.

मनीषने अंतिम फेरीत २३४.९ पाँइंट्स मिळवत रौप्य पदकावर हक्क सांगितला. त्याला कोरियाच्या जोंगडू जो याने मागे टाकत सुवर्ण पदक जिंकले. जो याने २३७.४ पाँइंट्स मिळवले. चीनच्या चाओ यांगने २१४.३ पाँइंट्स मिळवत कांस्य पदक जिंकले.

मनीषचे हे पॅरालिम्पिकमधील दुसरे पदक आहे. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये मिश्र गटात ५० मीटर पिस्तुल SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

अवनीला सुवर्णपदक

मनीषपूर्वी शुक्रवारी भारताला नेमबाजीतच अवनी लेखरा आणि मोना अगरवाल यांनी पदके मिळवून दिली. या दोघींनीही महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात ही शानदार कामगिरी केली.

अवनी लेखरा हिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर मोना अगरवाल हिने कांस्य पदक जिंकले. दरम्यान, अवनीचे हे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

प्रीतीला कांस्य पदक

भारताच्या खात्यातील तिसरे पदक प्रीती पाल हिने मिळवून दिले. तिने महिलांच्या T35 १०० मीटर प्रकारात कांस्य पदक जिंकले. तिने तिची सर्वोत्तम कामगिरी करताना हे पदक जिंकले. पॅरालिम्पिकमधील ऍथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारातील हे भारताचे पहिलेच पदक ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT