paris seine water quality Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : मॅरेथॉन जलतरण, ट्रायथलॉनसाठी सीन नदीचे पाणी निकृष्ट; चाचणीत स्पष्ट

paris Olympic latest news |ऑलिंपिकमध्ये भूषण मानली जाणारी फ्रान्सच्या राजधानीतील सीन नदी पोहण्यास योग्य नसल्याचे ताज्या चाचणीत उघड झाले. या नदीचे पाणी निकृष्ट दर्जाचे असून महापौराच्या पाण्यातील प्रसिद्ध डुबकीनंतरही भीती दूर झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : ऑलिंपिकमध्ये भूषण मानली जाणारी फ्रान्सच्या राजधानीतील सीन नदी पोहण्यास योग्य नसल्याचे ताज्या चाचणीत उघड झाले. या नदीचे पाणी निकृष्ट दर्जाचे असून महापौराच्या पाण्यातील प्रसिद्ध डुबकीनंतरही भीती दूर झालेली नाही.

ऑलिंपिकमधील मॅरेथॉन जलतरण आणि ट्रायथलॉन स्पर्धेसाठी सीन नदीचा वापर होईल. पॅरिस ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी सीन नदीतील पाण्याचा दर्जा तपासण्यात आला. पोहण्यासाठी आवश्यक असलेले निकष चाचणीत पूर्ण झाले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

ऑलिंपिक उद्घाटनाच्या वेळेस पॅरिस शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीर्घकाळ प्रदूषित असलेले पाणी जलतरण स्पर्धेसाठी आवश्यकतेनुसार स्वच्छ राहील का, याबाबत साशंकता आहे. फ्रेंच राजधानीतील हवामानावर पाण्याचा दर्जा अवलंबून आहे. सीन नदीच्या पाण्याबाबत भीती नष्ट व्हावी, या हेतूने पॅरिसच्या महापौर ॲन हिदाल्गो यांनी मोठा गाजावाजा करून सीन नदीत डुबकी घेतली होती.

चाचणीत पाणी नापास

सीन नदीच्या पाण्याची दररोज तपासणी होते. त्यात ई. कोली नामक मल जिवाणूंची मात्रा तपासली जाते. चाचणीवर देखरेख ठेवणाऱ्या गटानुसार, १७ जून रोजी पॅरिसच्या महापौर ॲन यांनी पाण्यात डुबकी घेतली तेव्हा पाण्यातील ब्रास मारी ई. कोलीचे प्रमाण संरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होते.

युरोपियन नियमानुसार १०० मिलीलिटरमागे ९०० युनिट असे ब्रास मारी ई. कोलीचे प्रमाण आवश्यक आहे. पॅरिस २०२४चे प्रमुख टोनी एस्टांगे व पॅरिस भागातील इतर प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांसमवेत पॅरिसच्या महापौर यांनी सीन नदीत जलतरण केले तेव्हा पाण्याचे प्रमाण ९८५ इतके होते.

मात्र, सीन नदीत ऑलिंपिक जलतरण स्पर्धा होणाऱ्या जागेवर पाण्याची गुणवत्ता सातपैकी सहा दिवस युरोपीय नियमांनुसार होती, असे पॅरिस सिटी हॉल आणि पॅरिस विभागीय अधिकाऱ्याने निवेदनात नमूद केले आहे. नियमित पावसामुळे सीन नदीचा प्रवाह अत्यंत अस्थिर असून उन्हाळ्यात नेहमीच प्रवाहापेक्षा दुप्पट असतो, असे पाण्याच्या चढ-उतार चाचणीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सीन नदीत पोहण्यास बंदी

सीन नदीत शतकाहून अधिक काळ पोहण्यास बंदी आहे. २०१५ पासून ऑलिंपिकनिमित्त सीन नदीच्या सज्जतेसाठी आणि स्पर्धेनंतरही नदी पॅरिसवासीयांसाठी अधिक स्वच्छ राहण्याची खात्री देण्यासाठी आयोजकांनी दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या योजनेअंतर्गत मध्य पॅरिसमध्ये भूगर्भातील पाणी साठवण्यासाठी मोठे कुंड, गटार व्यवस्थेचे नूतनीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या श्रेणीत सुधारणा करणे आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT