pat cummins and Becky Boston google
क्रीडा

प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला कमिन्सकडून 1 कोटी डॉलरचं गिफ्ट

या आनंदात पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडसाठी अलिशआन व्हिला गिफ्ट केलाय.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) लवकरच आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्नापूर्वीच गर्लफ्रेंडने त्याला गूड न्यूज दिलीये. बेकी बास्टन (Becky Boston) हिने 'बेबी बंप'चा फोटो शेअर करुन कमिन्स बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. या आनंदात पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडसाठी अलिशआन व्हिला गिफ्ट केलाय. टी-20 वर्ल्डकपच्या पूर्वीच बेकी बास्टन आई होणार आहे. यापूर्वीच कमिन्सने तिला खास गिफ्ट दिले आहे. पॅट कमिन्स आणि त्याची गर्लफ्रेंड बेकी बास्टन या दोघांनी सिडनी अलिशान व्हिला खरेदी केला. लग्नानंतर ही स्विट कपल या नव्या आणि अलिशान घरात वास्तव्य करणार असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यांनी जे अलिशान घर खरेदी केले आहे त्याची किंमत 9.5 मिलीयन डॉलर इतकी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

लग्नापूर्वीच पॅट कमिन्स होणार बाबा

कमिन्सच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियाच्या माध्यमातून गूड न्यूज दिली होती. तिच्या पोस्टवर डविड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर हिने खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले होते. सेंसेशनल न्यूज, अशा शब्दांत वॉर्नरच्या पत्नीने दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. कमिन्स आणि बेकी बास्टन बऱ्याच वर्षांपासून डेटिंग करत होते. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. पहिल्या बेबीच्या जन्मानंतर दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात पॅट कमिन्स कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतण्यासाठी भारतातून मालदीवला पोहचले आहेत. यात पॅट कमिन्सचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले असून 15 मे पर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवमध्येच थांबावे लागणार आहे. रविवारी पॅट कमिन्ससह अन्य खेळाडू मायदेशात पोहचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT