Gary Kirsten PCB Head Coach
Gary Kirsten PCB Head Coach esakal
क्रीडा

PCB Head Coach : भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कोचवर पाकिस्तानचा डोळा, स्प्लिट हेड कोचसाठी चाचपणी?

अनिरुद्ध संकपाळ

Gary Kirsten PCB Head Coach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची लाहोरमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद हे पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी यांनी भुषवलं. या बैठकीचा मुख्य अजेंडा हा पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा करण्याचा होता. निवडसमिती सदस्यांनी आपली मतं या बैठकीत नोंदवली.

याचबरोबर या बैठकीत पाकिस्तान संघासाठी दोन विदेशी प्रशिक्षक नेमण्याबाबत देखील चर्चा झाली. सध्याच्या घडीला पाकिस्तान संघाला हेड कोच नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार पीसीबी सध्या गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांच्याशी चर्चा करत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे एकाच विदेशी कोचवर अवलंबून राहणार नाहीये. पीसीबी हे स्प्लिट हेड कोचसाठी उत्सुक आहे. जर या दोघांनी प्रस्ताव स्विकारला तर ते वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाला मार्गदर्शन करतील.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की गॅरी कर्स्टन यांच्याकडे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाईल. दुसरीकडे, माजी ऑसी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीकडे रेड-बॉल फॉरमॅटमध्ये संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाईल.

मुख्य प्रशिक्षक निवडीव्यतिरिक्त, संघासाठी इतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीबाबतही व्यापक चर्चा झाली. संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती होणार हेही पाहायचे आहे. ICC T20 विश्वचषकापूर्वी संघाच्या कर्णधाराची निवड करणारी व्यक्ती मोहसीन नक्वी असेल.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT