क्रीडा

pro kabaddi 2019 : महाराष्ट्राच्या मोरेने साकारला गुजरातचा विजय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्राचा जी. बी. मोरे गुजरातचा तारणहार ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात फॉरच्युन जायंटस संघाने दबंग दिल्लीचा 31-26 असा पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तिसरा विजय मिळवला.

सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणारा गुजरातचा संघ अनुभवात उजवा आहे, परंतु दिल्लीने त्यांना झुंझवले. पिछाडीवरून बरोबरी नंतर आघाडी अशी दिल्लीने प्रगती केली, परंतु अखेरची सहा मिनिटे असताना त्यांना लोण स्वीकारावा लागला आणि 20-25 च्या पिछाडीनंतर त्यांना बाजी पलटवता आली नाही.

जी. बी. मोरेने चढायांत पाच तर पकडींमध्ये चार गुण मिळवले. तर दिल्लीकडून नवीन कुमारने सुपर टेनकरूनही गुजरातचीच सरशी ठरली.

सचिन तन्वर आणि रोहित गुलिया यांनी पहिल्या चढायांत बोनस गुण मिळवत गुजरातचे खाते उघडले लगेचच दिल्लीच्या नवीन कुमारची डू ऑर डाय चढाईत पकड करून 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने कसाबसा पहिला गुण मिळवला परंतु दुसरा गुण मिळवेपर्यंत आठ मिनिटांचा खेळ झाला होता. तोपर्यंत गुजरातने सहा गुणांची कमाई केली होती.

दिल्लीचा कोपरारक्षक चुका करत होता याचा फायदा गुजरातच्या डी. बी. मोरेने दोनदा घेतला 9-5 असा गुणफलक दिल्लीच्या बाजूने असताना नवीन कुमारने एकाच चढाईत दोन गुण मिळवले त्यानंतर चंद्रन रणजितनेही अशीत कामगिरी केली त्यामुळे मध्यांतरला गुजरातवर लोण देत दिल्लीने 14-11 अशी आघाडी घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT