क्रीडा

Pawan Sehrawat: ऐतिहासिक ! भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा बनला प्रो-कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

तेलगू टायटन्सने पवन सेहरावतसाठी २ कोटी ६० लाख रुपये मोजून आपल्या गोटात सामील केलं आहे.

Manoj Bhalerao

भारतीय कबड्डी संघाचा दिग्गज खेळाडू पवन सेहरावत सध्या आनंदाच्या परमोच्च शिखरावर आहे. नुकत्याच चीनच्या हँगझाऊ शहरात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने कबड्डीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

त्यानंतर प्रो-कबड्डी स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी घेण्यात आलेल्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू आहे. तेलगू टायटन्सने त्याला २.६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

पवन सेहरावत याचा कबड्डी विश्वात चांगलाच दरारा आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट रेडर्सपैकी तो एक आहे. त्याने २०१६ साली प्रो-कबड्डीच्या एका हंगामात ९८७ पॉईंटस् घेण्याचा विक्रम केला होता.

या हंगामात त्याने आपल्या चपळाईने विरोधी संघात हाहाकार माजवला होता. प्रो-कबड्डीच्या सर्व हंगामांवर जर नजर मारली तर सर्वाधिक पॉईंट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT