Naomi Osaka and  Rafael Nadal
Naomi Osaka and Rafael Nadal google
क्रीडा

नदालचा लॉरेस पुरस्काराचा चौकार, नोआमीचाही सन्मान

सुशांत जाधव

स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालला ( Rafael Nadal) 2021 च्या लॉरेस अवार्डने (Laureus World Sports Awards) सन्मानित करण्यात आले आहे. महिला टेनिसमध्ये जपानच्या 23 वर्षीय नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जपानच्या नाओमी ओसाकाने मागील वर्षी दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन (U S Open) स्पर्धा जिंकली होती. दुसरीकडे राफेल नदालने फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवत रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. राफेल नदालने चौथ्यांदा हा पुरस्कार पटकवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 22 व्या लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्काराचा सोहळा ऑनलाईन स्वरुपात पार पडला. या पुरस्काराच्या दावेदारीसाठी राफेल नदालसह लुईस हेमिल्टन, लेब्रोन जेम्स, रॉबर्ट लेवानदोवस्की या पुरुष खेळाडूंचा समावेश होता. महिलांमध्ये नाओमी ओसाकाने फेडेरिक ब्रिगनोन हिला मागे टाकून पुरस्कारावर नाव कोरले.

अन्य खेळाडू देखील माझ्याप्रमाणे या पुरस्कारासाठी पात्र असतील. पण यंदाचे वर्ष माझे होते. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण आहे, असे 34 वर्षीय नदालने म्हटले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केल्याचा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता, असेही नदालने म्हटले आहे.

अमेरिक ओपनच्या कोर्टवर उतरुन 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' मोहिमेला समर्थन देण्याच्या ओसाकाच्या भूमिकेचे लॉरेसने कौतुक केले. अमेरिकेत वर्णद्वेभेदाचा शिकार होऊन जीव गमावलेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या नावाचे मास्क ओसाकाने वापरल्याचे पाहायला मिळाले होते. एखाद्या मुद्यावर आवाज उठवणे महत्त्वपूर्ण असते. माझ्या भूमिकेबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार करत नाही, असे 23 वर्षीय नाओमी ओसाका हिने म्हटले आहे.

स्पेनमधील सेविले येथे डिजिटल अ‍ॅवार्ड समारंभात अमेरिकन टेनिस स्टार बिली जीन किंग यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनच्या बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबला सर्वोत्तम टीमचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT