Rahul Dravid
Rahul Dravid Sakal
क्रीडा

कोच पदासाठी द्रविड यांचा अर्ज; BCCI देणार शास्त्रींपेक्षा मोठं पॅकेज

सुशांत जाधव

श्रीलंका दौऱ्यावर तात्कालीन स्वरुपात प्रशिक्षकपदाची भूमिका बजावल्यापासूनच ते टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात होते.

Rahul Dravid Applied Team India Head Coach : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड या पदावर विराजमान होतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. या गोष्टीची आता अधिकृतरित्या पुष्टी झाली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड या पदावर विराजमान होणार असल्याचे जवळपास पक्के झाले आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पद सांभाळण्यासाठी तयार नव्हते. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याचे मन परिवर्तन करुन संघाला धडे देण्यासाठी राजी केलं आहे.

श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड यांनी वनडे आणि टी-20 मालिकेत तात्कालीन स्वरुपात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. यावेळीपासूनच ते आगामी काळात कायमस्वरुपी या पदावर दिसतील अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.

राहुल द्रविड यांना किती वेतन मिळेल?

राहुल द्रविड यांची भूमिका केवळ मुख्य प्रशिक्षक या पदापूर्ती मर्यादीत नसेल. ते मल्टी टास्किंग रोलमध्ये टीम इंडियासोबत कार्य करताना दिसतील. विद्यमान बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना 8.5 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज होते. त्यांच्यापेक्षा अधिक रक्कम द्रविड यांच्यासाठी बीसीसीआय मोजायला तयार असल्याचे समजते. जवळपास 10 कोटींची पॅकेज द्रविड यांना मिळेल, असे बोलले जात आहे.

अजय रात्रा फिल्डिंग कोच?

भारतीय संघाचे माजी विकेट किपर अजय रात्रा यांनी भारतीय संघाच्या फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला आहे. रात्रा यांनी 6 कसोटी आणि 12 वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय 99 फर्स्ट क्लास सामनेही त्यांनी खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी हरियाणाच्या संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी वर्णी लागू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT