Rahul Dravid  esakal
क्रीडा

IND vs NZ : मालिका विजय द्रविडसाठी डोकेदुखी; स्वतः सांगितले कारण

द्रविड म्हणाला; चांगली गोष्टच ठरतेय डोकेदुखी

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकला. ( IND vs NZ 2nd test ) भारताचा हा आतापर्यंतचा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय आहे. ( IND vs NZ Test Series ) न्यूझीलंडलच्या अखेरच्या जोडीने कानपूर टेस्ट ड्रॉ करत दोन सामन्यांच्या मालिकेत रंगत आणली होती. मात्र वानखेडे कसोटीत भारताने न्यूझीलंडचा पार धुव्वा उडवला. या विजयानंतर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड ( India coach ) यांनी संघातील युवा खेळाडूंची पाठ थोपटली. विशेष म्हणजे राहुल द्रविड ( Rahul Dravid ) संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्याच कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला आहे.

आर. अश्विनने ( R. Ashwin ) ४४ धावा करत चिवट फलंदाजी करणाऱ्या हेन्री निकोल्सला बाद करत मारताचा मालिका विजय साकारला. या मालिका विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रतिक्रिया देताना म्हणाले 'कसोटी मालिका विजयाने संपवल्याने आनंदी आहे. आम्ही कानपूर कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर होतो मात्र न्यूझीलंडच्या शेवटच्या विकेटने आम्हाला विजयापासून रोखले. कानपूर कसोटीनंतर आम्ही थोडे नाराज झालो होतो. मात्र खेळाडूंनी विशेष करुन वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीत चांगले पुनरागमन केले.'

राहुल द्रविड ( Rahul Dravid ) पुढे म्हणाला की, 'जयंत यादवला तिसऱ्या दिवशी विकेट घेण्यात समस्या येत होती. मात्र त्याने आज सकाळी उत्तम गोलंदाजी केली. यातील अनेक खेळाडूंना सातत्याने कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र तरीही श्रेयस अय्यर, ( Shreyas Iyer ) मयांक अग्रवाल, ( Mayank Agarwal ) अक्षर पटेल ( Axer Patel ) आणि जयंत यादव ( Jayant Yadav ) यांना चांगली कामगिरी करताना पाहून आनंद होतो. त्यामुळे आता संघात अनेक पर्याय तयार झाले आहेत.'

राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यांनी सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत भारताने आपला दुसरा डाव लवकर का घोषित केला नाही याबाबतही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'आम्हाला लवकर डाव घोषित करण्याबाबत विचार करण्याची गरज नाही. आमच्याकडे भरपूर वेळ होता आणि आम्हाला माहित होते की आम्ही न्यूझीलंडचा दुसरा डाव लगेचच गुंडाळू. अनेक युवा फलंदाजांना आव्हानात्मक परिस्थितीत खेळण्याची संधी देण्याची गरज होती. लाल मातीच्या विकेटवर खेळणे, ज्याप्रकारे या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता ते पाहता हा युवा फलंदाजांना एक उत्तम फलंदाज म्हणून तयार होण्यासाठी चांगला अनुभव होता.'

द्रविड दुखापतींबाबतही बोलले. ते म्हणाले 'दुसऱ्या कसोटीपूर्वी आमचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. संघातील खेळाडू विविध प्रकारात भरपूर क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला त्यांच्या वर्क लोडचाही विचार करावा लागले. पण, प्रत्येकजण विविध जागांवर आपली दावेदारी सांगत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. याचबरोबर ती एक मोठी डोकेदुखीही असते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT