India Vs Pakistan Rain esakal
क्रीडा

India Vs Pakistan Rain : विराट - राहुलनंतर पावसाची तुफान बॅटिंग, वरूणराजा रोहितला देतोय टेन्शन, कसं असेल इक्वेशन?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Rain DLS Equation : यंदाच्या आशिया कपवर वरूणराजा जास्तच प्रसन्न झाला आहे. विशेषकरून भारताच्या सामन्यावेळी हमखास पाऊस पडतोय. यामुळे भारताची आशिया कपमधील मोहीम अडखळतच सुरू आहे. पाकिस्तान विरूद्धचा ग्रुप स्टेजमधील सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर आता सुपर 4 मधील सामन्यावर देखील वरूणराजांनी आपली वक्रदृष्टी फिरवली आहे.

यामुळे एकदिवसीय सामना दोन दिवस खेळवून देखील निकाल अधांतरीच आहे. त्यामुळे डकवर्थ लुईसचे गणित लागू होणार का? लागू झाले तरी ते विजय कोणाच्या पारड्यात टाकणार? भारत - पाकिस्तानचा विषय सुटणार की 1 - 1 गुणावरच समाधान मानावे लागणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भारताने 2 बाद 147 धावा केल्यानंतर पहिला दिवस पावसाच्या पाण्यात वाहून गेला. राखीव दिवशी देखील सामना वेळेवर सुरू झाला नाही. अखेर सूर्यनारायण भारतावर प्रसन्न झाले आणि भारताने 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या. विराट कोहलीने 122 धावांची तर केएल राहुलने 111 धावांची धुवांधार खेळी केली.

त्यानंतर जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. इमाम उल हक 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने बाबरचा 11 धावांवर काटा काढत पाकिस्तानची अवस्थ 2 बाद 42 धावा अशी केली. पाकिस्तानच्या डावाची अवघी 11 षटके झाली होती. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा वरूणराजांनी बॅटिंग सुरू करत दोन्ही संघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

वरूणराजांच्या या खेळाचा फायदा कोणाला होणार पाकिस्तानला की भारताला? असा प्रश्न दोन्ही देशातील चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे आपण सामन्याच्या निकालाबाबतच्या काही शक्यता पाहू

- पाकिस्तानने 20 षटके फलंदाजी केलेली नाही त्यामुळे DLS चा नियम लागू होत नाही. जर पाऊस थांबलाच नाही तर सामना रद्द होईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी 1 - 1 गुणांवर समाधान मानावे लागेल.

- पाऊस थांबण्याची वाट दोन्ही संघ अजून 3 तास पाहू शकतात.

- अशा परिस्थितीत जर षटकांची संख्या घटवली तरी पाकिस्तानसमोर विजयासाठी पुढीलप्रमाणे आव्हान असेल

  • 26 षटकात 244 धावा

  • 24 षटकात 230 धावा

  • 22 षटकात 216 धावा

  • 20 षटकात 200 धावा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naval Kishor Ram : कितीही मोठा अधिकारी असला तरी कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

SCROLL FOR NEXT