raj thackeray Sachin Tendulkar jersey room kgm00 
क्रीडा

भेट राज ठाकरे शिंदे-फडणवीसांची पण चर्चा स्वेटरची, कोणाची आहे ही जर्सी ?

राज ठाकरेंच्या घरातील फोटोने वेधलं लक्ष; 'ते' स्वेटर कोणत्या खेळाडूंच?

Kiran Mahanavar

मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दीपोत्सवाचं आयोजन केला जातो. या दीपोत्सवाचं यंदा दहावं वर्ष आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच ट्विटरवरती एक फोटो पोस्ट करत एका नेटकऱ्याने वेगळाच प्रश्न विचारला आहे.

ट्विटरवरती राज ठाकरेने शिंदे-फडणवीस यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. बाकी ठीक आहे, पण ते भिंतीवरचं स्वेटर कोणत्या खेळाडूचं आहे? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. सुनंदन लेले यांना टॅग करत सर, काही कल्पना? असा प्रश्न विचारला आहे. शिंदे-फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीच्या फोटोमध्ये भिंतीवर इंडियन जर्सी दिसत आहे. एकीकडे यांच्या भेटीमुळे राजकारणात वेगळी चर्चा सुरू असतानाच जर्सीसंबधीचा हा प्रश्न इतर नेटकऱ्यांच लक्ष्य वेधून घेतले आहे.

या ट्विटवरती एका नेटकऱ्याने उत्तर दिले आहे. ही जर्सी सचिनची आहे. जेव्हा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर हे दोघे राजसाहेबांच्या घरी आले होते तेव्हा त्या त्यांच्या नव्या घरात आठवण म्हणून राहावी म्हणून राजसाहेबांनी एक एक वस्तु मागितली होती. त्यावेळी दिलेली ही जर्सी आहे असं उत्तर देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT